Sat. Dec 21st, 2024

समर्थ अर्बन बँक ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासास पात्र ठरेल-भास्करराव खतगावकर

Spread the love

समर्थ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. भोकरचा भव्य शुभारंभ संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्या शिवाय शेतकरी समृध्द होणार नाहीत.त्यांना शेतीतून चांगले उत्पादन घेण्यासाठी आर्थिक सहाय्याची नितांत गरज असते.ती गरज लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करता यावे हा उदात्त हेतूने समर्थ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेची निर्मिती करण्यात आली असून ही बँक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरेल असा विश्वास आहे,असे प्रतिपादन नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केले.भोकर येथे शुक्रवार, दि.१ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या समर्थ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
समर्थ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. भोकरचा दि.१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०५ वाजता प.पू.श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.यानंतर माऊली मंगल कार्यालय भोकर येथे भव्य शुभारंभ सोहळा साजरा करण्यात आला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,माजी जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी सनदी अधिकारी तथा अभिनेते एकनाथराव मोरे,माजी समाजकल्याण सभापती रामराव नाईक,भाऊसाहेब देशमुख गोरठेकर,सहायक निबंधक एम.एल.चौधरी,भिमराव कल्याणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,ओबीसी नेते नामदेव आयलवाड, गंपु पाटील नांदेकर,सुलोचना ढोले यांसह आदींची उपस्थिती होती.या प्रसंगी बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून बँक स्थापने माघील पार्श्वभूमी विषद केली व सविस्तर अशी माहिती दिली. यावेळी गोविंदराव नागेलीकर,डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले व बँकेच्या पुढील यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.तर अध्यक्षीय समारोपात बोलतांना भास्करराव पाटील खतगावकर पुढे म्हणाले की,शेती व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने,शेतकऱ्यांनी कितीही खर्च केला तरी उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही.शेतकऱ्यांना दिवसेंदिवस आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले पाहिजे व ही काळाची गरज आहे.खासगी बँकेच्या तुलनेत सहकारी बँका ९० टक्के शेतकऱ्यांना तारण न ठेवता कर्ज पुरवठा करीत असल्याने सहकारी बँका अडचणीत येत आहेत.नव्याने अस्तित्वात आलेल्या समर्थ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी,व्यापारी,लघु उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार व गरजूंचे हित जोपासल्या जाईल आणि नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरेल,असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.या शुभारंभ सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन बँकेचे संचालक डाॅ.मनोज गिमेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार संचालक ॲड.शिवाजी कदम नागापूरकर यांनी आभार मानले.तर हा शुभारंभ सोहळा यशस्वी करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आनंद ढवळे चिंचाळकर,संचालक शामसुंदर कदम,माधवराव पाटील पोमनाळकर,आत्रीक पाटील मुंगल, मारोतराव भोंबे,अंबादास जाधव,सौ.वसुंधरा कदम,सौ.उज्वला जाधव,शाखाधिकारी पी.आर.सुर्यवंशी यांसह आदींनी परिश्रम घेतले.यावेळी शेअर होल्डर,खातेदार,शेतकरी,व्यापारी, नागरिक यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !