शेतकऱ्यांना त्रास देणा-यांची आम्ही गय करणार नाही-इंजि.विश्वंभर पवार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक भूमिकेत
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते,पीक कर्ज आदींसाठी नाहक त्रास दिल्या जात असल्याच्या तक्रारी निदर्शनास येत असल्याने ‘त्या’ शेतकऱ्यांची कोणीही अडवणूक करु नये व नाहक त्रास ही देण्याचा कोणी प्रयत्न करु नये, अन्यथाअशा प्रकारे त्रास देणाऱ्यांची आम्ही गय करणार नाही आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने धडा शिकवू,असा ईशारा भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार यांनी दिला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष प्रमोद देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांच्या नेतृत्वात त्यांनी एक निवेदन पक्ष प्रमुख आणि प्रशासनास दिले आहे.
भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांना बी-बियाण्यासाठी, रासायनिक खते,पीक कर्जासाठी काही जणांकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक करुन नाहक त्रास दिल्या जात आहे.बी-बियाणे,रासायनिक खते यांचे भाव गगणाला भिडलेले असतांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ बँका करत असल्याने शेतकरीवर्ग पार मेटाकुटीस आला आहे.अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांतून असंतोषाची भावना व्यक्त होत असून अनेक तक्रारी पक्ष कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येत आहेत.याच अनुशंगाने तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांनी सर्व संबंधितांनी शेतकऱ्यांना कोणीही नाहक त्रास देऊन अडवणूक करु नये असे आवाहन केले असून असे होत असल्याची बाब समोर आल्यास ‘त्या’संबंधितांची गाठ आमच्याशी आहे व त्यांना आम्ही लोकशाही मार्गाने धडा शिकवू असा इशारा दिला आहे.
अगोदरच मान्सून उशिरा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून बँकेच्या अधिकाऱ्यांची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.शेतकर्यासोबत उद्धट बोलणे,त्यांच्या फाईली अंगावर फेकणे,वर्षानुवर्षे त्यांचे फाईली निकाली न काढणे, बी-बियाणे व रासायनिक खते चढ्या भावाने विकणे ह्या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील शेतकरी वैतागलेला आहे,या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या उपरोक्त प्रमुख मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार राजेश लांडगे यांनी तालुका कृषि अधिकारी, व्यापारी,बँक व्यवस्थापक यांसह आदींची एक व्यापक बैठक घेऊन ‘त्या’ संबंधितांना शेतकऱ्यांना कोणीही नाहक त्रास दिल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सुचवावे अथवा आदेशित करावे.असे निवेदन दि.६ जून २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व संबधितांना देण्यात आले आहे.याची दखल प्रशासनाने घेतली असून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही,असे आश्वस्त करण्यात आले आहे.
तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीन लोकशाही मार्गाने आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे.अशा आशयाचे निवेदन एका शिष्ठमंडळाने दिले असून त्या शिष्ठमंडळात व निवेदनावर स्वाक्ष-या असलेल्यांत प्रमोद देशमुख कामनगावकर,शेख जवाजोद्दीन बरबडेकर,इंजि. विश्वंभर पवार,भोकर शहराध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार, विधानसभा सचिव विशाल जैन,पंकज देशमुख भोसीकर, बालाजी पाटील गौड,संजय मुरगुलवार,युवक तालुकाध्यक्ष गणेश बोलेवार,युवक शहराध्यक्ष अफरोझ पठाण,आनंद पाटील सिंधिकर,रवी गेंटेवार,विजय पाटील सोळंके,डॉ विजय बोदीरवाड,आशिष अनंतवार,सिद्धू पाटील चिंचाळकर यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.