शिवसेना जि.प्र.नागेश पाटील यांनी स्व.वाघमारे कुटूंबीयांचे केले सांत्वन
पिंपळढव व दिवशी येथील विज पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटूंबियांची ही घेतली भेट व केले सांत्वन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ समाजसेवक स्व.लालबाजी वाघमारे यांचे दि.२१ सप्टेंबर रोजी दु:खद निधन झाल्याने शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दि.२३ सप्टेंबर रोजी स्व.वाघमारे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले असून तालुक्यातील पिंपळढव व दिवशी येथील विज पडून मृत्यू झालेल्या शेतकरी महिलांच्या कुटूंबियांची ही भेट घेऊन केले आहे सांत्वन.
शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी भोकर तालुक्याचा दौरा केला.या दौऱ्यादरम्यान त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिक नुकसानीचा आढावा घेतला.तसेच भोकर तालुक्यातील मातंग समाजाचे नेते व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ समाजसेवक स्व.लालबाजी वाघमारे(९९) यांचे दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी दु:खद निधन झाले.त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मा.आ.नागेश पाटील आष्टीकर हे उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांनी या दौ-यात स्व.लालबाजी वाघमारे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली व स्व.लालबाजी वाघमारे याचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते तथा बांधकाम कंत्राटदार नामदेव वाघमारे,त्यांचा पुतण्या राजेश वाघमारे व सर्व कुटूंबियांचे त्यांनी सांत्वन केले.तसेच पुढील काळात ते व शिवसेना वाघमारे कुटूंबियांसोबत सदैव राहील अशी ग्वाही दिली.यावेळी मा.आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या सोबत अॅड.परमेश्वर पांचाळ,सतिश देशमुख,माधव पाटील वडगावकर,पांडुरंग वर्षेवार,संतोष आलेवाड,बालाजी येलपे,सुनिल जाधव,श्याम वाघमारे, आनंदाबाई चुनगुरवाड यांसह आदी शिवसैनिक व भाजपाचे ता.सरचिटणीस बालाजी वाघमारे आणि आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए. हिरे व कंत्राटदार सखाराम वाघमारे यांची उपस्थिती होती.
पिंपळढव व दिवशी येथील विज पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटूंबियांची ही घेतली भेट व केले सांत्वन
तर शिवसेनेच्या तत्वानुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करणारे अनेक शिवसैनिक भोकर तालुक्यात आहेत.त्यापैकीच एक असलेले माजी भोकर शहर प्रमुख माधव पाटील वडगावकर यांनी दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी मौ.पिंपळढव येथील ललिता सुभाष पोले(४४) या शेतकरी महिलेचा विज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची व दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी मौ.दिवशी येथील शेतकरी महिला वर्षा शंकर तिगलवाड(४१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांना दिली होती.त्या अनुशंगाने या दौऱ्यादरम्यान मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी विज पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या पिडीत कुटूंबियांना शासनाचा सानुदान निधी मिळाला का नाही याचा आढावा घेतला व त्या दोन्ही कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि धिर दिला.या दौऱ्यादरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख मा.आ.नागेश पाटील आष्टीकर याचे भोकर येथील एकेकाळचे जुने शिवसैनिक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.यु.एल.जाधव,व्यापारी दिलीप तिवारी यांनी पुष्पहार घालून जंगी स्वागत केले.तर ग्रामीण भागातील मौ.कांडली,मातुळ येथे शिवसैनिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.यावेळी मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी भोकर शहरात लवकरच शिवसेना संपर्क कार्यालय निर्माण करण्यात येईल व जनसामान्यांसह शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल,अशी ग्वाही दिली.यावेळी अॅड. परमेश्वर पांचाळ,सतिश देशमुख,माधव पाटील वडगावकर, पांडुरंग वर्षेवार,संतोष आलेवाड,बालाजी येलपे,सुनिल जाधव,आनंदाबाई चुनगुरवाड, साहेबराव भोंबे,महोहर साखरे,गंगाधर महादावाड,रमेश पोलकमवार,दिवशीचे सरपंच गजानन ढगे,राजु पोगरे,आनंद जाधव हस्सापुरकर, कृष्णा कोंडलवार,माधव करेवाड,अक्षय शिंदे,रवण बोरगावे, रामा भालेराव,पप्पु पिंगलवाड यासह आदी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.