Sun. Dec 22nd, 2024

शहीदांचे बलीदान युवा पिढीचे मनोबल वाढविते-पो.उप.नि.अनिल कांबळे

Spread the love

कारगिल विजय दिनानिमित्त शहीद प्रफुल्ल कुमार गोवंदे यांना भोकर येथे वाहनण्यात आली आदरांजली

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भारतीय शूर सैनिकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीत मात देऊन दि. २६ जुलै रोजी कारगिल युद्ध जिंकले व भारताचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकविला.शूर वीर सैनिकांनी आपले शौर्य दाखवून भारत देशाची मान उंचाविली,हे युद्ध असो वा यापुर्वीचे असो यात शूर सैनिकांनी दिलेला लढा आणि त्यांचे योगदान,बलिदान सदैव प्रेरणादायीच आहे.तसेच शाहिदांचे हे बलीदान प्रेरणादायी असल्याने ते युवा पिढीचे मनोबल वाढवीते, असे प्रतिपादन भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांनी व्यक्त केले.ते कारगिल विजय दिनानिमित्त भोकर येथील शहीद प्रफुल्ल कुमार गोवंदे यांच्या स्मारकस्थळी दि.२६ जुलै रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

देशप्रेमी युवकांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त सकाळी १०:०० वाजता शहीद प्रफुल्ल कुमार गोवंदे यांच्या स्मारक स्थळी अभिवादन व वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे,शहिद प्रफुल कुमार गोवंदे यांचे पिता गणपतराव गोवंदे,न.प.चे वरिष्ठ लिपिक साहेबराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,माजी सैनिक देविदास कोंडामंगल,शिक्षक अनंता जोशी,मधूकर गोवंदे यांसह आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.शहीद प्रफुल्ल कुमार गोवंदे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून दोन मिनिटे स्तब्ध राहून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.तसेच स्मारकाच्या जागेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १०० वृक्षाचे रोपण करण्यात येऊन २३ वा कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.

अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या शूर वीर सैनिकांनी भारत मातेच्या रक्षणार्थ दिलेल्या कर्तव्यरुपी योगदान व बलीदानाचे स्मरण करुन अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.तर पो.उप.नि.अनिल कांबळे पुढे म्हणाले की,आपले शूर वीर जवान देश व देशवासी यांच्या रक्षणासाठी उन,पाऊस,थंडी, वारा व शत्रूंच्या प्रहाराची कसलीही तमा न बाळगता येणाऱ्या संकटांशी सामना करतात.त्यांच्या त्याग,सेवा व बलिदानाचा सर्वांनी नितांत आदर सन्मान केलाच पाहिजे,असे ही ते म्हणाले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विक्रम क्षीरसागर,गौतम कसबे,देवा हटकर,विशाल जैन,अनंता जोशी,गोविंद देशमुख,उमेश दुधारे,प्रशांत हनुमंते,सूरज तेलंग,संतोष गोवंदे,कुणाल मुनेश्वर,संतोष बेंबरकर,शशिकांत पत्की यासह आदी देशप्रेमी बांधवांनी उपस्थित राहून वीर शहीद जवानांना आदरांजली वाहिली व कारगिल विजय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !