वि.पो.म.नि.निसार तांबोळी यांनी पो.नि. विकास पाटील व सहका-यांचा केला सन्मान
सबळ पुराव्यानिशी १९ दिवसात दोषारोप पत्र दाखल केल्याने दिवशी बु.येथील अत्याचार घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा झाली होती.त्यामुळे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहनपर बक्षीस आणि प्रशसतीपत्र देऊन करण्यात आला आहे सन्मान
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : ५ वर्षीय बालीकेवर पाशवी अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केल्याच्या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रात उमटले होते.सदरील गुन्ह्यातील आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायधीस मुजीब एस.शेख यांनी दि.२३ मार्च २०२१ रोजी ‘त्या’ आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती.सदरील गुन्हा प्रकरणी भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास पाटील व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अगदी जलद गतीने तसेच अतिशय बारकाईने मुद्देसुदपणे सबळ पुराव्यांनिशी केवळ १९ दिवसाच्या आत भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची यशस्वी कामगिरी बजावली होती.यामुळे वि.पो.म.नि.निसार तांबोळी यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि.६ जून २०२१ रोजी प्रोत्साहनपर बक्षीस घोषित केले होते. वि.पो.म.नि.निसार तांबोळी यांच्या हस्ते दि.५ मार्च २०२२ रोजी सदरील बक्षिसाची रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन पो.नि.विकास पाटील व सहकारी पोलीसांचा सन्मान करण्यात आला आहे.यामुळे पो.नि. विकास पाटील व सर्व सन्मानार्थींचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
दिवशी बु.ता.भोकर येथील एका शेतक-याच्या ५ वर्षीय निष्पाप बालीकेवर अमानवीय,नैसर्गिक व अनैसर्गीक अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या सालगड्याने केल्याची संतापजनक घटना दि.२० जानेवारी २०२१ रोजी घडली होती.या अमानुष घटनेने संबंध मानवतेचे मन पार हेलाऊन गेले होते.तसेच या घटनेचे तीव्र पडसाद जनसामान्यांत उमटले होते.या प्रकरणी पिडीत मयत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिल्यावरुन मुलीस पळऊन नेऊन अत्याचार करुन खून केल्याचा व बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपी बाबूराव उखंडू सांगेराव उर्फ बाबूराव माळेगावकर (३५) रा. दिवशी बु.याच्या विरुद्ध भोकर पोलीसांत दि.२१ जानेवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच भोकर पोलीसांनी आरोपीस त्याच दिवसी घटनास्थळावरुन सबळ पुराव्यानिशी अटक केली होती.
सबंध मानवतेला काळीमा फासणा-या त्या अमानुष अत्याचार व खूनाच्या घटनेने भोकर तालुक्यासह महाराष्ट्राचे मन पार हेलाऊन गेले होते.यामुळे सदरील आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी व हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी विविध स्तरातून होत होती.विविध पक्ष,सामाजिक संघटना, महिला संघटनांनी यास्तव मोर्चे,धरणे,रास्ता रोकोसह आदी आंदोलने केली होती.तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार व भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी तपासचक्र गतीमान करुन अगदी बारकाईने व मुद्देसूद सखोल तपास करुन तपासाअंती अवघ्या १९ दिवसात सदरील गुन्हाचे दोषारोपपत्र दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात दाखल केले होते.या तपासकामी सहा.पो.नि.शंकर डेडवाल,पो.उप.नि. अनिल कांबळे,जमादार अशोक शिंगनवाड,जमादार धोंडीराम केंद्रे,जमादार शेषेराव चव्हाण,पैरवी अधिकारी पो.ना.फेरोज पठाण, पो.ना.दत्ता कदम,पो.ना.रवि मुधोळे, पो.कॉ.प्रकाश श्रीरामे,पो.कॉ.ज्ञानेश्वर सरोदे,पो.कॉ.नामदेव शिरोळे,चा.पो.कॉ.मंगेश क्षीरसागर यांनी पो.नि.विकास पाटील यांना सहकार्य करून अतिशय चांगली कामगिरी बजावली होती.
या तपासानुसार खटल्यातील साक्षीदाराची साक्ष,घटना स्थळावरील सबळ पुरावे,वैधकीय अहवाल आदी बाबी त्या आरोपी विरुद्ध गेल्या.यावरून आरोपी विरुध्दचा सर्व कलमांनुसारचा गुन्हा अखेर सिद्ध झाला होता.सबळ पुराव्यानिशी गुन्हा सिद्ध झाल्याने केवळ २३ दिवसात या गुन्ह्याचा निकाल जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी दि.२३ मार्च २०२१ रोजी दिला व यात उपरोक्त आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती.सदरील गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट व सबळ असा केल्यामुळे पो.नि.विकास पाटील यांना रोख ५ हजार रुपये व सहा.पो.नि.शंकर डेडवाल,पो.कॉ.प्रकाश श्रीरामे,पैरवी अधिकारी पो.ना.फेरोज पठाण,जमादार शेषेराव चव्हाण यांना प्रत्येकी रोख २ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी घोषीत केले होते.उपरोक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी बजावली असल्याने व पुढेही अशीच कामगिरी बजवावी म्हणून दि.५ मार्च २०२२ रोजी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी वि.पो.म.नि.निसार तांबोळी यांच्या हस्ते पो.नि.विकास पाटील व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहपर बक्षिस आणि प्रशसतीपत्र देऊन सन्मानित केले आहे.यावेळी भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व आदी पोलीस अधिका-यांची उपस्थिती होती.सदरील सन्ममानामुळे पो.नि.विकास पाटील व सर्व सन्मानार्थींचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.