Sun. Dec 22nd, 2024

लोकोपयोगी उपक्रमाणे नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस होतोय साजरा

Spread the love

वाढदिवसाच्या औचित्याने उद्या भोकर येथे होत आहे नामांकित कंपन्यांच्या सहभागातील महारोजगार मेळावा

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : सामाजिक जान व भान असलेले ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.७ जुलै रोजी भोकर येथे सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या अनुषंगाने नामांकित कंपन्यांच्या सहभागातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून लोकोपयोगी उपक्रमाणे हा वाढदिवस साजरा होणार आहे.तर या रोजगार महामेळाव्याचा गरजू व पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नेते,कार्यकर्ते यांचे वाढदिवस म्हटले की हार,तुरे आदी प्रकारे अनाठायी खर्च झालाच समजा.परंतू या अनाठायी खर्चास फाटा देऊन लोकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या अत्यल्पच असते.कारण सामाजिक जान व भान असणाऱ्यांनाच समाजातील उणिवांच्या जाणिवा असतात व असे लोक ही अत्यल्प असतात.त्या अत्यल्पातीलच एक नाव म्हणजे ओबीसी नेते नामदेव आयलवाड हे होय.डौर ता.भोकर येथील सर्व सामान्य कुटूंबात जन्मलेल्या नामदेव आयलवाड यांनी उच्च शिक्षण घेऊन उद्योग क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले.ग्रामीण भाग व या भागातील सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळेच सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या हाताला काम व रोजगार मिळावा यासाठी ते प्रयत्नरत असतात.दि.७ जुलै रोजी त्यांचा जन्मदिवस आहे.या औचित्याने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व त्यांना रोजगार उपलब्ध करून देता यावा या उदात्त हेतूने नामदेवराव आयलवाड मित्र मंडळाच्या वतीने दि.७ जुलै २०२३ रोजी संगम फंक्शन हॉल,रेल्वे स्टेशन रोड भोकर येथे सकाळी ११:०० वाजता नामांकित कंपन्यांच्या सहभागातून ‘महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

सदरील महारोजगार मेळाव्यातून गरजू,पात्र सुशिक्षित बेरोजगारांची निवड करण्यात येणार आहे.आय.टी. आय.उत्तीर्ण,एम.सी.व्ही.सी.कोर्स उत्तीर्ण,डिप्लोमा धारक,बी.ई.इंजीनियरिंग,बी.ए.,बी.कॉम.पदवीधर व अन्य शाखेतील पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.यातून पात्र सुशिक्षित बेरोजगारांची निवड होणार असल्याने सदरील रोजगार महामेळाव्याचा भोकर तालुक्यासह आदी भागातील अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा.यावेळी नामांकित कंपन्यांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार असून सुशिक्षित बेरोजगारांनी मुलाखतीसाठी शाळा सोडल्याचा दाखला,शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड, दोन पासपोर्ट फोटोंसह कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिंच्या प्रत्येकी दोन संचिका सोबत घेऊन यावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !