लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
भोकर पोलीसात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध भोकर पोलीसात भादवि व पोक्सो अंतर्गत च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय शाळकरी अल्पवयीन मुलीस त्याच गावातील एका तरुणाने प्रेम जाळ्यात ओढले व लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध केले.यावेळी सदरील तरुणाने त्याच्या मोबाईलमध्ये तिचे आक्षेपाहर्य फोटो काढले व तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध न केल्यास ते फोटो समाज माध्यमांवर टाकून बदनाम करतो आणि जीवे मारुन टाकतो अशी धमकी तिला दिली. हिच बाब पुढे करत व धमकावून २ महिन्यापूर्वी ते दि.२५ मे २०२२ चे दुपारी १२:०० वाजता पर्यंत गावाशेजारील माळावर नेऊन त्याने तिच्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध केले.
सदरील मुलीने त्या तरुणास लग्न कर म्हणून अनेक वेळा म्हटले.परंतु त्याने यास नकार दिला.यामुळे त्या पिडीत अल्पवयीन मुलीने भोकर पोलीसात विशाल बाबुराव डाके या तरुणाविरुद्ध उपरोक्त आशयानुसार दि.१ जून २०२२ रोजी फिर्याद दिली.यावरुन याप्रकरणी गुरन.१९४/२०२२ कलम ३७६(३), ३७६(२)(एन.),३५४(ब),५०६ भादवि. आणि सहकलम ४, ८,१२ पोक्सो प्रमाणे अमिष दाखवून धमकावून बलात्कार केल्याचा गुन्हा पो.उप.नि.अनिल कांबळे यांनी उपरोक्त उल्लेखीत तरुणाविरुद्ध दाखल केला. तर सदरील तरुण गावातून पसार झाला असून पो.नि. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.उप.नि. राणी भोंडवे या सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास करत आहेत.