Sun. Dec 22nd, 2024

रोहित दादा पाटील यांच्या हस्ते ‘अग्रणीकाठ’ कथासंग्रहाचे झाले प्रकाशन

Spread the love

सावळज जि.सांगली चे भूमिपुत्र तथा लेखक आण्णासाहेब कांबळे लिखित आहे हा कथासंग्रह

अंबुज प्रहार प्रतिनिधी

सावळज : सावळज गावचे सुपुत्र तथा लेखक आण्णासाहेब कांबळे यांनी लिहिलेल्या ‘अग्रणीकाठ’ या कथासंग्रहाचे रोहित दादा पाटील व जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांच्या हस्ते सावळज येथे नुकतेच प्रकाशन झाले आहे.

सावळज जि.सांगली चे भूमिपुत्र तथा लेखक आण्णासाहेब कांबळे यांचा ‘अग्रणीकाठ’ हा कथासंग्रह नुकताच पुर्णत्वास आला आहे.सदरील कथासंग्रह प्रकाशन सोहळा नुकताच महात्मा गांधी विद्यालय,सावळज जि.सांगली येथे संपन्न झाला.सदरील सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित दादा पाटील,जेष्ठ साहित्यिक प्रा.सुभाष कवडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रोहित दादा पाटील आणि सुभाष कवडे यांच्या हस्ते या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रकाशन सोहळ्यास संबोधित करतांना रोहित दादा पाटील म्हणाले की,ज्याप्रमाणे सावळज मध्ये अनेकांनी कला,राजकीय, शैक्षणिक,शेती व आदी क्षेत्रातमध्ये नावलौकिक केले आहे.त्याचप्रमाणे या ‘अग्रणीकाठ’ या कथासंग्रहाच्या माध्यमातून आण्णासाहेब कांबळे यांनी साहित्य क्षेत्रात भर टाकली आहे,याचा आम्हास अत्यानंद झाला आहे.तर जेष्ठ साहित्यिक प्रा.सुभाष कवडे हे म्हणाले की,या कथासंग्रहातून वाचकांना एक सामाजिक संदेश नक्कीच मिळणार आहे.येणाऱ्या काळात आण्णासाहेब कांबळे यांसारख्या लेखकाची प्रेरणा घेऊन अनेक समृद्ध लेखक घडोत,असे ही ते म्हणाले.

या प्रकाशन सोहळ्यास किशोर उनउने,वसंत सावंत,सागर पाटील,ताज्जुद्दिन तांबोळी,सरपंच स्वातीताई पोळ,संजय थोरात,प्रवीण धेंडे ,प्राचार्य एस.एन.पाटील,दिलीप उनउने, भूपाल सावळजकर,रमेश कांबळे,विजय पोतदार,महात्मा गांधी विद्यालयाचे विध्यार्थी,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तरूण मंडळाचे पदाधिकारी,सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावकरी यांसह आदींची उपस्थिती होती.सोहळ्याचे प्रास्ताविक पिंटू कांबळे यांनी केले.तर सुरेख असे सुत्रसंचालन म्हेत्रे सर यांनी केले व उपस्थितांचे आभार अमित कांबळे यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !