Fri. Jun 6th, 2025

राज्यस्तरीय कायाकल्प पथकाने ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दिली भेट

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : राज्यस्तरीय कायाकल्प पथकाने आज दि.१६ जून रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील विविध विभागाना भेटी देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

राज्यस्तरीय कायाकल्प पथकामधील डॉ.सुभाष केंद्रेडॉ. रितेश बाळापुरे व महिला डॉ.तिवारी यांचे ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या वतीने प्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर सर्व कर्मचा-यांची यांची बैठक घेऊन त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली व उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अशोक मुंडे,अस्थीरोग तज्ञ डॉ.नितीन कळसकर,बालरोग तज्ञ डॉ.सारीका जावळीकर,डॉ.सागर रेड्डी,दंत शल्यचिकित्सक डॉ.राजाराम कोळेकर,डॉ व्यंकटेश टाकळकर,डॉ.अपर्णा जोशी,डॉ.ज्योती यन्नावार,डॉ.विजयालक्ष्मी किनीकर,डॉ. अविनाश गुंडाळे,डॉ.मुद्दशीर,डॉ.थोरवट,सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख,लिपिक साबेर पाशा,बालाजी चांडोळकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ,परिसेविका श्रीमती सुचिता नवघडे,राजश्री ब्राम्हणे,जीजा भवरे,निलोफर पठाण, अधिपरिचारीका दिपके,नेत्रचिकित्सक संतोष करपे, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर,गंगामोहन शिंदे,संदिप ठाकूर,मल्हार मोरे,औषध निर्माण अधिकारी गिरी,रावलोड, पांडुरंग तम्मलवाड,आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे,प्रयोगशाळा सहाय्यक झाहेद अलि,समुपदेशक कठारे,श्रीमती सरस्वती दिवटे,संगीता पंदिलवाड,मुक्ता गुट्टे, स्वाती सुवर्णकार, डवरे , भालेराव आरोग्य सेविका,रेणुका भिसे,कठारे,सुरेश डुम्मलवाड,आरोग्य मित्र सुधाकर गंगातीरे,वाहनचालक कदम,बडेलू, सुरक्षारक्षक महादळे, शिंदे मामा आदी कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !