Mon. Dec 23rd, 2024

राजे शिवराय शिक्षक पतसंस्था भोकर च्या चेअरमन पदी जकियोद्दीन शेख

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : राजे शिवराय जि.प.शिक्षक पतसंस्था मर्यादित ता.भोकर,ऊमरी ची पंचवार्षिक निवडणूक बिन विरोध पार पडली. परंतू चेअरमन पद निवडीच्या दिवशी लोकशाही मार्गाने मैत्रीपुर्ण निवडणूक झाली व यात जकीयोद्दीन शेख बरबडेकर यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

यमैत्रीपूर्ण लढतीत झालेल्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वरिष्ठ सल्लागार तथा कन्या शाळा भोकरचे केंद्रप्रमुख जकियोद्दीन शेख बरबडेकर यांची चेअरमन पदी,तर राजेश्वर गोविंदराव चक्रवार यांची सचिव पदी आणि नामदेव नागनाथ शिंदे उमरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी हे सर्वजण ३ विरुद्ध ७ अशा मतांनी विजयी झाले.

खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे उपस्थितांनी स्वागत केले.या प्रसंगी शिक्षक परिषदेचे प्रदेश संघटन मंत्री सुरेश दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली विजयी सभा घेण्यात आली. या सभेस वरिष्ठ सल्लागार नेते बालाजी‌ तुमवाड,जिल्हा उपाध्यक्ष माधव तिडके पाटील,जि.प.शि.व कर्मचारीचे पतसंस्थेचे चेअरमन शंकर बेळकोणे,भगवान जोगदंड, श्रीकृष्ण वट्टमवार,विनायक होनशेट्टे व नवनिर्वाचीत संचालक बालाजी अक्कलवाड,बालाजी गादगे,मारोती कदम,सौ.कांचन जोशी,सौ.चौदंते,संजय गुंडले,सुदाम बुरकुले,नागेश कॅरमकोंडा,प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील थडीसावळीकर यांसह शिक्षक सभासद आणि पतसंस्थेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आले व पतसंस्थेच्या पुढील सेवाकार्य आणि भरभराटीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

🌹🌹
नवनिर्वाचित चेअरमन जकीयोद्दीन शेख बरबडेकर आणि सर्व पदाधिका-यांचे संपादक उत्तम बाबळे यांच्या वतीने मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !