Mon. Dec 23rd, 2024

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती भोकर अध्यक्षपदी शिवा पाटील माने

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर :‌ प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ भोसले यांचा जन्मोत्सव सोहळा भोकरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या औचित्याने जन्मोत्सव सोहळा समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी शिवा पाटील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंती निमित्त भोकर येथे विविध कार्यक्रम व लोकोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.या अनुषंगाने सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती गठीत करण्यासाठी दि.११ डिसेंबर २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर,गोविंद पाटील ढगे, आनंद पाटील सिंधीकर,मनसे तालुका प्रमुख साईप्रसाद जटलवार,आनंद पाटील हसापूरकर आकाश गेंटेवार,पवन पवार,दशरथ पाटील हसापूरकर, भोसले पाटील हळदेकर यांसह बहुसंख्य माँसाहेब जिजाऊ भोसले व छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव सोहळा समिती गठीत करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी शिवा पाटील माने,उपाध्यक्षपदी प्रशांत पाटील पोमनाळकर,राजू पाटील कवडे, सचिवपदी सुनिल पाटील बटाळकर,कोषाध्यक्षपदी कपिल पाटील किन्हाळकर यांसह आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.गठीत करण्यात आलेल्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले व जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्ही परिश्रम घेऊ अशी ग्वाही उपस्थितांना दिली.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !