म.फुले दाम्पत्य,शाहू महाराज व अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे
या मागणीसाठीचे नांदेडमधील धरणे आंदोलन मोठ्या प्रतिसादात संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : शैक्षणिक क्रांतीचे अग्रदुत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले, आरक्षण क्रांतीचे महामेरु छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि शुन्यातून अक्षर साहित्याचे वैश्विक विचारपीठ निर्माण करणारे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या महान बहुजन उद्धारकांना मरणोत्तर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाच्या सर्वोच्च सन्मानाचा ‘भारतरत्न पुरस्कार’ बहाल करुन सन्मानित करण्यात यावे,यास्तवची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे तात्काळ करावी यामागणीसाठी दि.१० ऑक्टोबर रोजी नांदेड मध्ये विविध सामाजिक संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन मोठ्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाले आहे.
महाराष्ट्राची भूमी ही साधू-संतांची,महात्म्ये,शास्त्रज्ञ आणि समाजसुधारकांची पावनभूमी आहे.महाराष्ट्राने देशाचे अनेक विद्वान थोर सुपुत्र घडवले आहेत.एका जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार्या महाराष्ट्राने देशाच्या इतिहासात अभूतपूर्व योगदान दिले आहे.राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले या फुले दांपत्याने समाजातील वंचितांना शिक्षणरुपी शक्तीची गुटी पाजली आहे.तर वंचित समाजास आरक्षणासारखे आयुध बहाल करून देशातील जनतेला न्यायाच्या राज्याची संकल्पना छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी प्रत्यक्षात आणून दाखविली आहे.तसेच अस्पृश्य समाजात जन्मलेल्या व चार भिंतीच्या आतील शाळेचा काळा फळा कधीही न पाहिलेल्या आणि अनुभवाच्या शाळेतील तुटपुंज्या शिक्षण संपदेवर मराठी साहित्याला अनेक जागतिक भाषांमध्ये मानाचे वैश्विक स्थान मिळवून देणा-या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे राज्य व देशासाठी मोठे योगदान आहे.म्हणून उपरोक्त महान विभुतींना भारत देशाचा सर्वात मोठा सन्मानाचा ’भारतरत्न पुरस्कार’ देवून त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान व्हायला पाहिजे ही लोकभावना आहे.त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे या मागणीसाठी गेली अनेक वर्षे विविध संघटनांनी एकत्रितपणे अनेक आंदोलने,उपोषणे केली आहेत.ह्याच अनुषंगाने नांदेड जिल्यातील विविध जाती-धर्माच्या संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सोमवार,दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले याच्या पुतळ्या जवळ,नांदेड येथे महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना २०२२ या वर्षात मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा या राष्ट्रहिताच्या मागणीसाठी सामुहिक धरणे आंदोलन केले.तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून उपरोक्त मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
विविध सामाजिक संघटनांच्या या सामुहिक आंदोलनात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे प्रमुख सतीश कावडे, ओबीसी समन्वय समितीचे नेते नामदेव आयलवाड, नंदकुमार कोसबतवार,नागनाथराव देशमुख,राष्ट्रीय गुरू रविदास समता परिषदेचे प्रमुख इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉ.गंगाधर गायकवाड,मानवी हक्क अभियानाचे मच्छिंद्र गवाले,बीसेफचे एच.पी.कांबळे, लसाकमचे प्रा.सी.एल.कदम,मानवहीत लोकशाही पार्टीचे किशोर कवडीकर,भारतीय लहूजी सेनेचे आनंद थोटवे, राष्ट्रीय कम्युनिष्ट पार्टीचे अंबादास भंडारे,राष्ट्रीय समाज पार्टीचे गोविंदराम सुरनर, जमाते इस्लामी हिंदचे मोहसीन खान,हाफिज मौलाना,अबराहट देशमुख,वंचित बहुजन आघाडीचे आनंदराव शिनगारे,दीपक मगर,बहुजन भारत पार्टीचे एस.एम.गारे,बसपाचे प्रभाकर होळकर,नागोराव नामेवार,ओबीसी समाजाचे नेते इंजि. संजयकुमार अवस्ती, गोडसे महाराज,प्रमोद अटकेलवार, व्यंकटराव पार्डीकर, भाऊराव हटकर,क्रांती आंदोलनाचे शिवाजी नुरूंदे,चंपतराव हातागळे,नागेश तादलापूरकर,आनंद वंजारे,व्यंकट सूर्यवंशी, बालाजी भोसले,गंगाधर खुणे,गजानन खुणे,बालाजी खुणे, रमेश गायकवाड,इंजि.माधव बुचडे,माजी सैनिक वाय.जी. वाघमारे,भीमराव बल्लूरकर,सुभाष चांदणे,बालाजी गऊळकर,प्रा.जी.एल.सूर्यवंशी,व्ही.बी.गाडेकर,संतोष दासरवाड,मंगेश गऊळकर,माधव निंबाळकर,रामभाऊ देवकांबळे,हनमंत माळेगावकर,अजिंक्य रानवळकर,संजय देवकांबळे,खंडू देवकांबळे,पिराजी देवकांबळे,विठ्ठल देवकांबळे,गणपती देवकांबळे,दिगंबर बिजले,भगवान वाकोडे यांसह असंख्य महिला,पुरूष,सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.तसेच या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येऊन धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.