Mon. Dec 23rd, 2024

मौ.वाघी येथील मातंग कुटूंबातील अपहरण पिडीतांना न्याय द्या !

Spread the love

अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन सामाजिक संघटना व समविचारींंची मागणी

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : मौ.वाघी ता.जि.नांदेड येथील मातंग समाजातील शिवाजी मारोती यांचे गावातील काही जातीयवादी गावगुंडांनी अपहरण करुन बेपत्ता केल्याच्या घटनेस जवळपास २० दिवस होऊन गेलेत. परंतू अद्यापही ‘त्या’ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने अपहरण झालेल्या इसमाच्या पिडीत पत्नीने सदरील आरोपींविरुद्ध तात्काळ कारवाई व्हावी या व इतर मागण्या घेऊन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण सुरु केले असून या अपहरण पिडीतांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन व समविचारी संघटनांनी केली आहे.

मौ.वाघी ता.जि.नांदेड येथील मातंग समाजातील शिवाजी मारोती खुणे यांचे त्याच गावातील काही जातीयवादी गावगुंडांनी गेल्या २० दिवसांपुर्वी अपहरण करून बेप्पता केलेले आहे.माझ्या पतीचे अपहरण करुन बेपत्ता करणाऱ्या संशयीत आरोपीं विरूद्ध पोलीसांनी तात्काळ कार्यवाही करावी,अशी लेखी फिर्याद बेपत्ता झालेल्या इसमाची पत्नी धुरपताबाई शिवाजी खुणे रा.वाघी यांना लिंबगाव ता.जि. नांदेड पोलीस ठाण्यात दिली आहे.तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री,नांदेड जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी,अर्धापूर यांचेकडे देखील त्याबाबत निवेदन पाठविले आहेत.परंतू जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांनी अद्यापही याबाबतीत दखल घेतली नसल्याने कौटूंबिक न्यायासाठी तिने साखळी उपोषण सुरु केलेले आहे.याच बरोबर कायद्याची योग्य ती खबरदारी घेत जातीयवादी गावगुंडांचा योग्य बंदोबस्त करावा,तद्वतच मौ.वाघी येथील मातंग समाजातील महिला-पुरूष यांच्या विरूद्ध लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या दरोड्याचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा,यासह आदी मागण्यांसाठी पिडीत महिलेसह मौ.वाघी येथील मातंग समाजातील महिला-पुरूष हे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय,नांदेड येथे सुरु असलेल्या ‘साखळी उपोषण व धरणे आंदोलनात’ सहभागी झाले आहेत.

कौटूंबिक व सामाजिक न्यायासाठी सुरु असलेल्या या आंदोलनाकडे शासन प्रशासनाने च्या गांर्भीयाने पाहून दखल घेऊन त्या अत्याचारी लोकांवर उचित कारवाई तात्काळ करणे गरजेचे आहे.परंतू कसलीही ठोस कारवाई न करता या संविधानिक आंदोलनाकडे केवळ कागदी घोडे दौडविण्याचा प्रकार सुरु आहे.गेल्या १५ ते १७ दिवसांपासून न्यायदाद मागण्यांसाठी मौ.वाघी येथील हे पिडीत मातंग कुटूंब आंदोलन करत असतांना ही त्यांना न्याय दिला जात नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी व त्या मागण्यांप्रमाणे उचित कारवाई करावी.मौ.वाघी ता.जि.नांदेड या गावातील ज्या जातीयवादी गावगुंडानी शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे गैर कायदाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरूद्ध योग्य ती पोलीस कारवाई करावी. तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे ही गुन्हा दाखल करुन पिडीतांना संरक्षण द्यावे व अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेऊन न्याय द्यावा यासह आदी मागण्यांचे निवेदन दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे व संघटनेचे अन्य पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार,जिल्हाध्यक्ष शिवाजी नुरूंदे,संघटक चंपतराव हातागळे,नागेश तादलापुरकर,आनंद वंजारे,से.नि.पो.उपनिरीक्षक एन.डी. रोडे,एच.बी.बोरगावकर,मौ.वाघी येथील आंदोलन कर्त्या धुरपताबाई शिवाजी खुणे,गजानन खुणे,रमेश गायकवाड, धर्माजी खुणे,बालाजी भोसले,संतोष दस्तके,गंगाधर गणपती खुणे,शिलाबाई गजले,गयाबाई गायकवाड, क्षशोभाबाई खुणे,शुषेलाबाई गंगाधर खुने,शेषेराव खुणे, उद्धव गायकवाड,यासह मौ.वाघी येथील मातंग समाजातील आदी महिला-पुरूषांच्या शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी प्रदिप कुळकर्णी यांना दिले आहे.तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करुन न्याय मिळावा अशी विनंती केली आहे.तसेच तात्काळ न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !