Mon. Dec 23rd, 2024

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान यशस्वीतेसाठी भोकर येथे ग्रामसेवकांची आढावा बैठक संपन्न

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान देशभर राबविले जात आहे.भोकर तालुक्यात ही हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून सदरील अभियान यशस्वीतेसाठी दि.४ ऑगस्ट रोजी भोकर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील ग्रामसेवक व संबंधितांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली आहे.हे अभियान उत्साही स्वरूपात व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकारी,कर्मचारी व ग्रामसेवकांनी दिली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ (मिट्टी को नमन,वीरों को वंदन) हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याच अनुषंगाने दि.४ ऑगस्ट २०२३ रोजी पंचायत समिती भोकर च्या सभागृहात तालुक्यातील ग्रामसेवक व संबंधितांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली आहे.प्रत्येक राज्यातील गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती,प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी आणि या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे.त्यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील गावांत संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करणे,दोन मूठ माती घेऊन कलश तयार करून तो सन्मानपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरा- वरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविणे,त्यासाठी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.हे अभियान दि.९ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविले जाणार आहे.’मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानामध्ये प्रमुख पाच उपक्रमांचा समावेश असून त्यांची अंमलबजावणी व अभियान यशस्वीतेसाठी ही बैठक घेण्यात आली आहे.त्या ५ उपक्रमांत गावातील एका संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणे,त्यावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो,नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, दिनांक,देशाचे पंतप्रधान यांचा संदेश,स्थानिक शहीद वीरांची नावे,’मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता प्राणांची आहुती दिलेल्या शुरवीरांना विनम्र अभिवादन’ असे वाक्य त्या शिलाफलकावर नमूद करणे.तसेच देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून योग्य जागा निश्चित करून ” वसुधा वंदन” म्हणून विविध देशी प्रजातींच्या ७५ रोपट्यांची लागवड करून अमृतवाटिका तयार करणे,याच बरोबर ज्यांनी देशासाठी,स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी बलिदान केले अशा सरंक्षण दल,निम संरक्षण दल,पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी किंवा माजी सैनिकांचा सन्मान करणे.तसेच स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी,अधिकारी,कर्मचारी,शासकीय कार्यालये,ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सामुहिक प्रतिज्ञा घेणे.राष्ट्रगीत गायन व ध्वजारोहन कार्यक्रम आयोजित करणे,यासह आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी उपरोक्त अभियान नियोजनबद्ध राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.याच अनुषंगाने भोकर येथे घेण्यात आलेल्या बैठकीस मार्गदर्शक म्हणून भोकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पं)एस.आर कांबळे,कृषि अधिकारी संदीप कोस्केवाड,एस.टी. शेटवाड,सिद्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.तर भोकर पंचायत समिती अंतर्गतच्या ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,नोडल अधिकारी,केंद्र प्रमुख यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.या आढावा बैठकीत उपस्थितांनी हे अभियान उत्साही स्वरूपात व नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही राबवू असे वरिष्ठांना आश्वस्त केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !