Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

भोकर मध्ये” माझी वसुंधरा “अभियानाची कलापथकाद्वारे जनजागृती…

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : नगर परिषद कार्यालय भोकर च्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती महात्मा फुले नगर येथे दि.१६ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता लोक जागृती कला पथक भोकर च्या वतीने करण्यात आली.

भोकर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून पर्यावरण संवर्धन,शहराची स्वच्छता,नागरिकांचा,विद्यार्थ्यांचा सहभाग, विविध स्पर्धा असे उपक्रम राबविण्यात येत असून लोक जागृती कलापथक भोकर च्या वतीने शहरात विविध महत्त्वाच्या ठिकाणी उपविभागगीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक राजेंद्र खंदारे,मुख्याधिकारी सौ.प्रियंका टोंगे यांच्या मार्गदर्शनानुसार जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.भोकर शहरात फुलेनगर येथे लोक जागृती कलापथका द्वारे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार उत्कृष्ट वादक बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तर नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप वाघमारे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.लोक जागृती कला पथकाचे प्रमुख बी.आर.पांचाळ यांनी गीत गायन व संवादाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धन,वृक्षारोपण,निसर्गाच्या पंचातत्वावर आधारित जल, भूमी,वायू,अग्नि,आकाश या माध्यमातून हरित कवच, पर्यावरण संवर्धन, हरित मूल्य,जैवविविधता,घनकचरा व्यवस्थापन,कचऱ्याचे विलगीकरण,नद्यांची स्वच्छता, पावसाच्या पाण्याची साठवणूक, प्लास्टिक बंदी अशा विषयाच्या माध्यमातून गीत पोवाडे सादर करून प्रबोधन केले.शाहीर रमेश नार्लेवाड,जयश्री पोत्रे,सयदु अमेट्वाड, ज्ञानेश्वर बोईनवाड,राम खांडरे,श्रीनिवास नार्लेवाड यांचा सहभाग होता यावेळी नगर परिषदेचे अभियंता किशोर राठोड,शाहीर माधव वाघमारे,बाबुराव गाडेकर,के.वाय. देवकांबळे,राजू दांडगे,बाल गायक संकल्प जाधव,गायक धम्मदिप जाधव दिगंबर डोंगरे,श्रीमती गायकवाड बाई यांसह आदीं नागरिकांची उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !