Mon. Dec 23rd, 2024

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी भोकर विभागीय कार्यकारीणी अध्यक्षपदी पिंपरे

Spread the love

तर उपाध्यक्षपदी गणेश दुधकावडे आणि सचिवपदी अरविंद सावते यांची निवड

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी भोकर विभागीय कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली असून या कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी एस.व्ही.पिंपरे यांची,तर उपाध्यक्षपदी गणेश दुधकावडे, साईनाथ कल्याणकर,बी.सी.शिंदे आणि सचिवपदी अरविंद सावते यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांच्या आदेशानुसार भोकर येथे एस.व्ही.पिंपरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली व या बैठकीत सर्वानुमते संघटनेच्या नुतन भोकर विभागीय कार्यकारीणी ची निवड करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन रणवीर, अविनाश खंदारे,राम भोंगळे,राजेश मिरगेवाड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

सर्वानुमते निवडण्यात आलेली भोकर विभागीय कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे…विभागीय अध्यक्षपदी एस.व्ही.पिंपरे,उपाध्यक्षपदी गणेश दुधकावडे,साईनाथ कल्याणकर,बी.सी.शिंदे,सचिवपदी अरविंद सावते, संघटकपदी राम भोंगाळे,सहसचिवपदी ए.ए.चव्हाण,
कोषाध्यक्षपदी एन.जे.कावळे,प्रसिद्धी प्रमुखपदी एस.एस. फोले,सल्लागार डी.एस.पवार,तर सदस्यपदी नागेश पट्टपेवाड,सुखदेव डोंगरे,पवन कनाके,बलभीम खांडेकर, अतुल तिव्हाळे,साईनाथ राचरवाड आणि महिला प्रतिनिधी म्हणून रुखसाना अ.करीम,श्रीमती पी.पी.स्थूल यांची निवड करण्यात आली.सदरील कार्यकारीणी निवडीच्या बैठकीस बहुसंख्य सभासद उपस्थित होते.या उपस्थितांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !