‘महिलांचे सक्षमीकरण होणे म्हणजे तिचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठीची संधी देणे होय!’-डॉ.सरोज गायकवाड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.६ मार्च रोजी आयोजित व्याख्यानमालेचे ३८० वे पुष्प गुंफण्यात आले होते.यात “महिलांचे सबलीकरण किती खरे-खोटे” या विषयावर बोलताना डॉ.सरोज गायकवाड(ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर,मुखेड जि.नांदेड) यांनी आपले मत व्यक्त केले.
यापुढे त्या म्हणाल्या,समाजातील अर्धी शक्ती ही स्त्री शक्ती आहे, ती अबला न राहता संबला झाली पाहिजे.स्त्रीभ्रूणहत्या सारख्या समस्या कमी न होता वाढतच आहेत.महिलांना समाजामध्ये वर्चस्व नको समता हवी आहे,स्त्री-पुरुष समतेचे वारे समाजात निर्माण होऊन समाज प्रगतीस चालना मिळेल.त्यांनी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ महिलांबाबत काय म्हणतात ते सुद्धा सांगितले,”बायांनो किती संकटे येऊ द्या संघर्ष करा हिम्मत करा, कारण देशाची माय कणखर असले पाहिजे.माय नसेल तर लेकरू अनाथ होईल.”
सदर कार्यक्रमाचे संयोजक दादासाहेब सोनवणे (माजी संघप्रमुख),लक्ष्मण लोंढे (अध्यक्ष),संपर्क प्रमुख साहेबराव खंडाळे,राजेंद्र अण्णा शेंडगे,डॉक्टर नारायण डोलारे,डॉक्टर प्राध्यापक सुहास नाईक,सनी सिद्धेश्वर जाधव,संतोष माने, प्रा.डॉ.मारुती कसाब,सुजित रणदिवे व संदीप जाधव (सचिव दलित स्वयंसेवक संघ)यांसह आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.