Mon. Dec 23rd, 2024

महामानवांच्या विचारांवर चालणारी पिढी तयार करण्यासाठी मानवहितचा उपयोग व्हावा-ॲड.टी.एन कांबळे

Spread the love

क्रांतिगुरु लहुजी साळवे व सुभेदार रामजी सपकाळ यांनी लेखणीचे वारसदार निर्माण केले-संपादक उत्तम बाबळे

भोकर येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे झाले मोठ्या जल्लोषात लोकार्पण

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : वंचित,उपेक्षित समाजाला महामानवांने विचार वैचारिक प्रगल्भ करु शकतात.म्हणूनच त्या विचारांवर चालणारी पिढी निर्माण करण्याचे काम मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून होत आहे.ती प्रगल्भ पिढी तयार करण्यासाठी या पक्ष कार्यालयाचा उपयोग व्हावा,असे प्रतिपादन मानवहित लोकशाही पक्षाचे कोर कमिटी अध्यक्ष ॲड.टी.एन कांबळे यांनी व्यक्त केले.तर आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे व सुभेदार रामजी सपकाळ हे शस्त्र कला निपुण योद्धे असतांनाही त्यांनी त्या सर्व शस्त्रांत सर्वात मोठे शस्त्र हे लेखणी असल्याचे मानले होते. त्यामुळेच त्यांनी महात्मा जोतिबा फुले,माता सावित्रीबाई फुले,मुक्ता साळवे व विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारखे झुंजार लेखणीचे वारसदार निर्माण केले,असे प्रतिपादन संपादक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.उपरोक्त दोघे ही दि.१४ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या भोकर येथे मानवहित लोकशाही पक्ष कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उद्घाटक व अध्यक्ष म्हणून बोलत होते.

आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंती दिन औचित्याने भोकर शहरातील किनवट रोड येथील एका प्रशस्त इमारतीत दि.१४ नोव्हेंबर २०२२ रोजी मानवहित लोकशाही पक्ष तालुका संपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून मानवहित लोकशाही पक्षाचे कोर कमिटी अध्यक्ष ॲड.टी.एन कांबळे व या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणा राज्य प्रदेशाध्यक्ष गणपती चंद्रभान घोडापुरकर,महाराष्ट्र प्रचारक व्यंकटी सोनटक्के,मराठवाडा सचिव बाळासाहेब खानजोडे, जिल्हाध्यक्ष मालोजीराजे वाघमारे दहिकळंबेकर, जिल्हा अध्यक्ष (उ.) किशोर कवडीकर तळेगावकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पार्वतीताई बरकंबे, जिल्हा संपर्कप्रमुख नागेश महाराज घोडजकर,निर्मल जिल्हा अध्यक्षा सुरेखाताई पोलिसकर,धुरपतबाई बासनुरे,सावित्रीताई पोलीसकर,जेष्ठ पत्रकार गंगाधर पडवळे,के.सुधांशू,कमलाकर बरकमकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर कवडीकर यांसह आदी पदाधिकाऱ्यांनी जयंती व प‌क्ष कार्यालय लोकार्पण सोहळ्यास अनुसरुन मनोगत व्यक्त केले.तर उद्घाटक म्हणून बोलतांना कोर कमिटी अध्यक्ष ॲड.टी.एन कांबळे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे,महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांसह आदी महामानवांच्या विचारांवर चालणारी पिढी तयार करण्यासाठी सचिन भाऊ साठे,गणेश भगत यांच्या नेतृत्वाखाली मानवहित लोकशाही पक्ष राज्यात काम करत आहे.भोकर येथे स्थापन झालेले हे राज्यातील दुसरे संपर्क कार्यालय असून या कार्यालयातून ही सक्षम वैचारिक पिढी घडविण्याचे काम व चांगला उपयोग भविष्यात व्हावा आणि या भागात पक्ष बळकटीचे काम करणाऱ्यांना पक्षातर्फे ताकद देण्याचे प्रमुख काम यापुढील काळात होईल याची मला खात्री आहे,असे ते म्हणाले.

तर अध्यक्षिय समारोपात संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे व सुभेदार रामजी सपकाळ (आंबेडकर) या दोन शस्त्र कला निपुण महायोद्ध्यांची दि.१४ नोव्हेंबर रोजी जयंती आहे.हे दोन्ही महायोद्धे युद्ध व शस्त्र विद्या कलेत निपुण होते.परंतू वंचित, उपेक्षित,शोषित,पिडीत समाजाच्या भावी पिढीस खऱ्या अर्थाने मुलभूत अधिकार व स्वातंत्र्य केवळ शिक्षणातूनच मिळू शकते याची जान त्यांना होती.म्हणूनच अस्पृश्य,बहुजणांच्या शिक्षणासाठी शाळा असाव्यात यासाठी पुण्यातील गंजपेठेत महात्मा फुले वाड्यासमोर संपन्न झालेल्या शिक्षण प्रचाराच्या देशातील पहिल्या सभेचे अध्यक्ष आद्य क्रांतिगुरु लहुजी यांनी महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,फातिमा शेख,मुक्ता साळवे यांना भक्कम साथ,पाठींबा आणि संरक्षण देऊन शैक्षणिक चळवळ उभी केली.त्यामुळेच आज आपण शिक्षित झालो आहोत.तर सुभेदार रामजी सपकाळ यांनी पुत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने आपल्या झुंजार लेखणीतून देशास राज्य घटना देऊन सर्वाधिकार देणारा महामानव घडविला.तसेच उपरोक्त महामानवांचे विचार आत्मसात करुन समता, बंधूंचा,न्याय,हक्काचे प्रतिक असलेला ‘फकिरा’ विश्वसाहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपणास दिला.नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस ‘फकिरा’ अर्पण करुन लेखणीचा वारसा चालविला आहे.वरील सर्व लेखणीच्या वारसदारांच्या विचारांवर आपण चाललं पाहिजे,वैचारिक वारसा पुढे नेला पाहिजे आणि हे काम मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून झालच पाहिजे.तसेच लेखणीच्या वारसदाराच्या या पक्षाला गालबोट लागणार नाही याची काळजी ही सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे,अशा सुचनाही अध्यक्षिय समारोप करताना त्यांनी दिल्या.

या सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते‌‌‌ तथा सरपंच प्रतिनिधी साईनाथ गायकवाड नागठाणेकर,हदगाव तालुका अध्यक्षा वंदनाताई पोतरे,भोकर तालुका अध्यक्षा भाग्यश्री शिरगीरकर,सचिव छायाताई मोरे, कैलास मोतेकर,संतोष काळे,सुनिल बरकंबे,दत्ता कांबळे बटाळेकर,ठिकाणी कांबळे,सुभाष शेळके, मारोती गायकवाड,रामेश्वर शिंगणीकर,चंद्रकांत कुडकेकर,अमोल गायकवाड,माधव गाडेकर बटाळा, राजु टिकेकर यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.युवा जिल्हाध्यक्षा संजय वाघमारे बोथीकर व जिल्हा कार्याध्यक्ष गजानन गाडेकर यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या या पक्ष कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संजय वाघमारे बोथीकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार किशोर कवडीकर यांनी मानले. तसेच हा सोहळा व उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत मौ.बटाळा या.भोकर ग्राम शाखेच्या नाम फलकाचे अनावरण यशस्वी करण्यासाठी भोकर तालुका अध्यक्ष शंकर दिवटेकर,युवा तालुका अध्यक्ष अंबादास बोयावार,शहर अध्यक्ष मुकुंद गोरलेकर,अजय गव्हाळे, आनंदा चिलीमवाड,ज्ञानेश्वर गायकवाड यांसह आदींनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !