Mon. Dec 23rd, 2024

मनोज आव्हाडच्या मारेकर्‍यांना फाशी द्या-अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाची मागणी

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरुन मनोज शेषेराव आव्हाड या मागासवर्गीय मातंग तरुणाचे हातपाय बांधून अमानुषपणे लाठ्या-काठ्यांनी ठेचून एका टोळक्याने जीवे मारल्याची अमानविय व गंभीर घटना दि.२० एप्रिल २०२२ रोजी घडली आहे.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यात कायदा-सुव्यवस्था उरलेली दिसत नाही.महाराष्ट्रात आता जंगलराज सुरू झाले आहे का? असा संतप्त सवाल अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाने या सामाजिक संघटनेने उपस्थित केला आहे.तसेच सदरील घटनेचा या संघटनेने तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला असून ‘त्या’ सर्व मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केल्याचे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दि.२५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना पाठविले आहे.

हडको,औरंगाबाद परिसरातील एका माजी नगरसेवकाच्या मंगल कार्यालयात वाचमन म्हणून काम करत असलेल्या मनोज शेषेराव आव्हाड(२७) या मागासवर्गीय मातंग तरुणाने फोकस लाईट व वायर चोरल्याच्या संशय करुन मंगल कार्यालय चालक असलेल्या माजी नगरसेवकाचे २ मुले इतर ६ जण अशा ८ जणांच्या टोळक्याने दि.२० एप्रिल २०२२ रोजी त्यास घरुन खोटे कारण सांगून कट रचून आणले व त्याचे हातपाय बांधून लाठ्या-काठ्यांनी शरिरातील हाडे मोडेपर्यं बेदम मारहाण केली.मनोज आव्हाड हा दया,याचना करत ओरडत होता,परंतू त्या नराधमांनी त्याच्यावर कोणतीही दया दाखवली नाही.एवढेच नाही तर त्या नराधमांनी या घटनेचे मोबाईलद्वारे व्हीडीओ चित्रिकरण केले व ते मनोज आव्हाड च्या नातेवाईकांना पाठवला.याचबरोबर या आरोपींनी त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयात टाकून पळ काढला.

सदरील गुन्ह्याची घटना ही अमानवी व निर्दयीपणाचा कळस गाठणारी आहे.या गुन्हेगारांनी संघटीतरित्या केलेले हे कृत्य आणि त्यांची मानसिकता लक्षात घेता त्यांना कायद्याची आणि पोलीस यंत्रणेची कोणतीही भिती नसल्याचे अधोरेखित होते.हे कृत्य अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे.त्यामुळे अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,प्रजासत्ताक पार्टी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शासनानेे या घटनेची गंभीर दखल घेऊन सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, अशी मागणी केली असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दि.२५ एप्रिल २०२२ एका निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व आदी संबंधीतांना दिला असून या शिष्टमंडळात सतीश कावडे,प्रा.डॉ.विठ्ठल भंडारे,परमेश्वर बंडेवार,दिगंबर मोरे,एच.पी.कांबळे,गंगाधर कावडे,शिवाजी नुरूंदे,नामदेव कांबळे, नागेश तादलापूरकर,सुनील मोघेकर,आनंद वंजारे,संतोष सूर्यवंशी, सुरेश कांबळे,अ‍ॅड.एम.जी.बादलगावकर,अ‍ॅड.शिवराज कोळीकर,शंकर शिरसे,इंजि.एस.पी.राके,विठ्ठल घाटे,यादव सूर्यवंशी,शंकर गायकवाड, सर्जेराव वाघमारे,एस.एम.गारे यांसह आदींचा समावेश होता.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !