मद्यधुंद अवस्थेत रुग्णावर उपचार करणाऱ्या ब्रदरवर कारवाई करा…
कोल्हापूर पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी…!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालीकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील एका ब्रदरने मद्यधुंद अवस्थेत रुग्णांवर उपचार करुन त्यांच्या जीवित्वाशी खेळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या ब्रदर विरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष मुसा (भाई) मुल्ला यांनी रुग्णालय व्यवस्थापन अधिकारी व संबंधितांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका संचलीत सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी ब्रदर शेखर कांबळे हे दि.६ एप्रिल २०२२ रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रुग्णांवर उपचार करत असल्याची गंभीर बाब उपस्थित रुग्ण व नातेवाईकांच्या निदर्शनास आली.यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब रुग्णालय व्यवस्थापन व अधिका-यांना सांगितली.परंतु उपस्थित संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले व मद्यधुंद ब्रदरने ही धमकीवजा अर्वाच्च भाषा वापरली. तसेच त्या अधिका-यांनी यावेळी घटनेचा पंचनामा केला,परंतु त्या विरुद्ध कसलीही कारवाई केली नाही. यामुळे रुग्णालय व्यवस्थापन त्यास पाठीशी घालत आहे व काही अधिकारी हे रुग्णालयात भ्रष्टाचार ही करत आहेत.त्यामुळे सदरील ब्रदर व त्या अधिक-यांची खाते निहाय चौकशी करण्यात यावी,त्या ब्रदर विरुद्ध कारवाई करण्यात यावी,अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषद कोल्हापूर च्या वतीने करण्यात आली असून सदरील मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष मुसा (भाई ) मुल्ला,अनिकेत चव्हाण,संभाजी चौगुले,दीपक शिंगे,राधिका कांबळे यांसह आदींनी सावित्रीबाई फुले रुग्णालयात, कोल्हापूरच्या आरोग्य अधिकारी सौ.यादव यांना दिले आहे.तसेच तात्काळ कारवाईचे करण्यात आली नाही,तर आम्ही मोर्चा आंदोलन करु असा इशारा ही त्यांनी दिला आहे.