Mon. Dec 23rd, 2024

भोकर राष्ट्रवादीने केले वाढती महागाई व केंद्र शासन विरोधात धरणे आंदोलन

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात वाढत्या महागाई विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनास या महागाईस जबाबदार धरुन निषेध ही व्यक्त केला आहे.

देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ दर वाढ झालेली असल्याने सर्वसामान्य आणि वाहनधारकांचे पार कंबरडे मोडले आहे.बी-बियाणे व खतांचे भाव ही गगणाला भिडले असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.वाढत्या महागाईमुळे शेतीची कामे व परिवारासाठी डाळ,तांदूळ, कडधान्य आणि गॅस दरवाढ याचा ताळमेळ लावणे कठीण झालेले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे मात्र विदेश दौऱ्यावर असतात असा आरोप ही भोकर राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.यामळे देशभरात संतापाची लाठ पसरली असून याच अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात जनसामान्यांचे प्रश्न घेऊन आंदोलने केली जात आहेत.

या आंदोलनाचाच एक भाग म्हणून पक्ष वरिष्ठांच्या आदेशाने दि.२४ मे २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद देशमुख कामणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष जवाजोद्दीन बरबडेकर व तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच वाढत्या महागाईमुळे गोरगरीब जनता कशी परेशान आहे,याबाबत शहराध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार,इंजि.विश्वंभर पवार व प्रमोद देशमुख कामणगावकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.तर या आंदोलनात भोकर विधानसभा सचिव विषाल महाजन बारडकर,युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश बोलेवार,तालुका कार्याध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी कदम,शहराध्यक्ष अफरोज पठाण,तालुका कोषाध्यक्ष बालाजी पाटील गौड, शहर संघटक संजय पाटील मुरुगुलवार,माजी नगरसेवक शेख वकील शेख खैराती,खाजा तोफिक इनामदार, उपाध्यक्ष पंकज देशमुख भोसीकर,आनंद पाटील शिंदीकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष गंगाधर कल्याने,विजय पाटील सोळंके, डॉक्टर सेल चे तालुकाध्यक्ष डॉ.विजय बोंदीरवाड, उपाध्यक्ष बाळासाहेब नांदेकर,सतीश पाटील चिंचाळकर योगेश पाटील रेणापूरकर,बाळासाहेब येल्लूरे,सरचिटणीस सिद्धू पाटील चिंचालकर,रवी गेंटेवार,अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष खुददुस कुरेशी,आशिष अनंतवार,यांसह आदींनी सहभाग घेतला होता.सदरील आंदोलनाविषयीचे निवेदन तहसिलदार राजेश लांडगे यांना देण्यात येऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !