Sat. Dec 21st, 2024

भोकर येथे समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेचा उद्या शुभारंभ

Spread the love

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व खासदार प्रतापराव पाटील यांची उपस्थिती राहणार- बाळासाहेब पाटील रावणगावकर

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथे नव्याने सुरु होत असलेल्या समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.चा उद्या दि.१ डिसेंबर २०२३ रोजी शुभारंभ सोहळा संपन्न होणार असून सदरील सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांनी दिली असून सदरील सोहळ्यास बँकचे शेअर होल्डर,शेतकरी, व्यापारी यांसह बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकरी,व्यापारी,सुशिक्षित तरुण,लघु उद्योजक, यांसह सर्वसामान्य लोकांना स्वावलंबी बनविण्यापाठी व त्यांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने भोकर शहरात नव्यानेच समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.ची भोकर तालुक्यातील भुमिपुत्रांनी एकत्र येऊन स्थापना केली आहे.सदरील बँकेचा उद्या दि.१ डिसेंबर २०२३ रोजी शुभारंभ करण्यात येत असून सकाळी ११:०५ वाजता नांदेड रोड भोकर येथील मुख्य कार्यालय व कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरातील समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.भोकर शाखा कार्यालयाचा प.पू. श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज ( दत्तसंस्थान,मठ पिंपळगांव) यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.तद्नंतर माऊली मंगल कार्यालय भोकर येथे शुभारंभ सोहळ्याचे आयोजीत करण्यात आले असून संदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगांवकर,माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,माजी आमदार अमरनाथ राजूरकर,कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,सिने अभिनेते यथा माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे,माजी सभापती आप्पाराव सोमठाणकर, जिल्हा उपनिबंधक व्ही.आर.देशमुख,सहाय्यक निबंधक एम.एल.चौधरी यांसह आदिंची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास शेअर होल्डर,शेतकरी,व्यापारी यांसह नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन समर्थ अर्बन को.ऑ.बँक लि.चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर,उपाध्यक्ष आनंद ढवळे पाटील,संचालक शामसुंदर कदम,माधवराव पोमनाळकर,रावसाहेब लामकाणीकर,ॲड.शिवाजी कदम,आत्रीक मुंगल,डॉ.मनोज गिमेकर,मारोतराव भोंबे,शिवाजी सोळंके,शेख शब्बीर शेख मुराद,अंबादास जाधव,दिगंबर लोलपवाड,सौ.वसुंधरा कदम, सौ.उज्वला जाधव,शाखाधिकारी पी.आर.सुर्यवंशी यांनी केले आहे.

 


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !