Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शहरातील भोकर-किनवट रस्त्यावरील बोरगाव रस्ता वळण चौकात दि.११ डिसेंबर रोजी आदिलाबाद कडून भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट वाहू अवजड ट्रकने दुचाकी स्वारांना पाठीमागून उडविले.या भिषण अपघातात दुचाकी वरील महीला जागीच ठार झाली असून दुचाकी चालक जखमी झाला आहे.

वैजापूर पार्डी ता.मुदखेड येथील शांताबाई रामराव मलदोडे (६०) ही महीला दि.१० डिसेंबर २०२२ रोजी थेरबन ता.भोकर येथील नातेवाईक महिलेच्या अंत्यविधीसाठी आली होती.दि.११ डिसेंबर रोजी सकाळी पाखरांना दूध घालण्याचा विधी आटोपून ती राजू आनंदराव मुसळे,रा.थेरबन या नातवासोबत दुचाकी क्र.टि.एस.१८ सी.२३०० वरून गावाकडे निघाली होती.सकाळी ११:१५ वाजता च्या दरम्यान त्यांची दुचाकी भोकर शहरातील भोकर-किनवट रस्त्यावरील बोरगाव रस्ता वळण चौकात आली असता किनवट कडून भोकर कडे सिमेंट घेऊन भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्र.एम.एच.२६ बी.ई.९०९८ घ्या चालकाचा गतीवरील ताबा सुटला व त्या ट्रकने दुचाकीस पाठीमागून उडविले.या भीषण अपघातात दुचाकीवरील उपरोक्त महीला ट्रक खाली चिरडल्या गेली व जागीच ठार झाली.तर दुचाकी स्वार दूर फेकल्या गेल्याने सुदैवाने बचावला असून तो जखमी झाला आहे.

सदरील आपघाताची माहिती भोकर पोलीसांना समजताच सहाय्यक पो.नि.रसुल तांबोळी,पो.उप.नि. दिगांबर पाटील,पो.उप.नि.अनिल कांबळे,जमादार संजय पांढरे,प्रकाश वाळवे,सुभाष कदम,वाहतूक पोलीस कर्मचारी लंगडे यासह आदीजण तात्काळ घटनास्थळी पोहोचले.घटनास्थळ हे शहरात असल्यामुळे बघ्याची मोठी गर्दी तेथे जमली होती.ती गर्दी दुर करुन काही नागरिकांच्या मदतीने मयत महिलेचा छिन्न-विछिन्न झालेला मृतदेह व अवयव गोळा करून उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठविण्यात आले.तर हा भिषण अपघात करुन पसार झालेला तो ट्रक भोकर पोलीसांनी पाठलाग करुन भोकर-नांदेड रस्त्यावरील नारवट गावाजवळ पकडला.

मयत महिलेचा नातू तथा जखमी दुचाकी स्वार राजू आनंदराव मुसळे,या.थेरबन यांनी फिर्याद दिल्यावरुन उपरोक्त ट्रक चालका विरुद्ध भा.द.वि व मोटार वाहन कायदा अधिनियमाच्या विविध कलमान्वये भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.अनिल कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.तर नातेवाईकाच्या अंत्यविधीस आलेल्या व अंत्यविधी करून घरी परत जात असलेल्या या दुर्दैवी मयत महिलेच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत असून तिच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.तसेच भोकर येथील खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार गणपतराव मुसळे व डॉ.बाबूराव मलदोडे यांच्या त्या जवळील नातेवाईक होत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !