Fri. Apr 11th, 2025

भोकर येथील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत वाघमारे यांचे दुःखद निधन

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : मुळचे मंगलसांगवी ता.कंधार येथील व नेहरू नगर भोकर येथे स्थायिक झालेले महसूल.विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत ज्ञानोबा वाघमारे यांचे दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान भोकर येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दु:खद निधन झाले आहे.

अतिशय मनमिळावू,कष्ठाळू,अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते.त्यांच्या जाण्याने वाघमारे परिवारासह नातेवाईक व स्नेहिजणांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कै.चंद्रकांत वाघमारे यांच्या पश्चात २ भाऊ, भावजया,४ बहिणी,मेहुणे,२ पत्नी,५ मुलं,२ मुली, सुना,व नातवंडे असा मोठा परिवार आहे.उद्या दि.२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहन भुमी भोकर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाघमारे परिवाराच्या दु:खात संपादक उत्तम बाबळे व परिवार सहभागी असून कै.चंद्रकांत वाघमारे यांना भावपुर्ण श्रद्धांजली !

विश्व साहित्यभुषण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी त्रिवार वंदन आणि सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा !-संपादक


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !