भोकर येथील समर्थ अर्बन बँकेच्या सोने तारण कर्ज व इतर योजनेच्या माहिती पत्रकाचे झाले विमोचन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरात नव्याने सुरू झालेल्या समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.ने नव वर्षाच्या शुभमुहूर्तावर लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध योजना सुरु केल्या असून सोने तारण कर्ज वाटपासह विविध योजनेच्या माहिती पत्रकाचे सोमवार,दि.१ जानेवारी रोजी विमोचन करण्यात आले आहे.
शेतकरी,व्यापारी,सुशिक्षित तरुण,बचतगट आदिसह विविध क्षेत्रातील गरजूंचे हित लक्षात घेऊन समर्थ अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि.भोकर बँकेच्या वतीने नव वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सोने तारण योजनेचा शुभारंभ करण्यात आला.या योजनेचे सर्वप्रथम लाभार्थी म्हणून अंबर कदम,रा. रावणगाव ता.भोकर हे ठरले असून त्यांना नोंदपत्र देवून योजनेस प्रारंभ केला आहे.याचबरोबर मुलींच्या लग्नासाठी वटवृक्ष ठेव योजना,शेतकऱ्यांच्या मालासाठी मालतारण कर्ज योजना,सोने तारण कर्ज योजना,उद्योग कर्ज योजना,वाहन कर्ज योजना,गृहकर्ज योजना,बचतगट कर्ज योजना,छोटे व्यावसायिक कर्ज योजना यांसह विविध योजनेच्या माहिती पत्रकाचे ही यावेळी बँकेच्या कार्यालयात बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष आनंद पाटील ढवळे,संचालक डॉ.मनोज गिमेकर,अंबादास जाधव, दिगंबर लोलपवाड,रा. पुरोगामी पत्रकार संघाचे भोकर तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड,शाखाधिकारी प्रविण सुर्यवंशी यांसह बँकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.तसेच बँकेत खातेदारांची खाती उघडण्यास ही सुरवात झाली असून नागरिकांनी विविध कर्जाचे खाते उघडून घ्यावेत व विविध योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे.