भोकर येथील संकल्प अकॅडमीत ‘राष्ट्रीय गणित दिवस’ साजरा
तर पथनाट्य स्पर्धेतील विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन करण्यात आला सत्कार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस दि.२२ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केल्या जातो.याच अनुषंगाने संकल्प अकॅडमी भोकर येथे विविध उपक्रमांनी हा जयंती दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती व राष्ट्रीय गणित दिवस आणि आजारी का अमृत महोत्सव निमित्ताने संकल्प अकॅडमी भोकर ने विविध उपक्रम राबविले.त्यात दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी आजादी का अमृत महोत्सव साजरा केला गेल्याच्या निमित्ताने भोकर नगरपालिका येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत संकल्प अकॅडमी ने सहभाग घेतला व पथनाट्य स्पर्धेत संकल्प अकॅडमी ला प्रथम पारितोषिक मिळाले.याच अनुषंगाने राष्ट्रीय गणित दिवशी संकल्प अकॅडमी भोकर येथे कार्यक्रम घेण्यात आला व त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या पथनाट्यातील विद्यार्थ्यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. व्यंकटराव माने (क्रीडा प्रमुख,डी.बी.कॉलेज,भोकर), प्रा.डॉ.सतीश खवले (अमृतवाणी इंजिनिअरिंग कॉलेज,संगमनेर,अहमदनगर) यांच्या उपस्थिती होती. तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रथमेश तेलंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प अकॅडमीचे संचालक कुशल देशमुख आणि सतीश देशमुख व आदीने परिश्रम घेतले.