भोकर येथील श्रीमती विमल मधुकरराव जोशी यांचे वृद्धापकाळी दु:खद निधन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील प्रख्यात पुरोहित स्व.मधुकरराव जोशी यांच्या पत्नी श्रीमती विमल मधुकरराव जोशी (९०) रा.जोशी गल्ली,इनामदार गल्ली परिसर भोकर जि.नांदेड यांचे दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अल्पश: आजारात वृद्धापकाळी राहत्या घरी दु:खद निधन झालं आहे.काही महिन्यांपासून त्याना हृदयविकाराचा आजार होता.
जि.प.के.प्राथमिक शाळा बेंबर ता.भोकर या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनंत मधुकरराव जोशी आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर चे पदाधिकारी तथा साधना टि.व्ही.चॅनलचे भोकर तालुका प्रतिनिधी पत्रकार रमाकांत मधुकरराव जोशी यांच्या त्या मातोश्री होत.स्व.मातोश्री विमल मधुकरराव जोशी यांच्यावर आज दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहनभूमी, भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,तीन सुना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व.मातोश्रींना संपादक उत्तम बाबळे,अंबुज प्रहार परिवार व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या सर्व पदाधिकारी बांधवांची विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!