Sat. Dec 21st, 2024

भोकर येथील राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत प्रथम विजेता ठरली ऋतुजा पाटील

Spread the love

द्वितीय ठरली धनश्री कदम,तर तृतीय विजेता ठरला संकेत पाटील

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकरच्या वतीने ‘आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या सुटतील काय?’ या विषयावर कै.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. सदरील स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ३५ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता.यात महाराष्ट्राचा महावक्ता म्हणून ३१ हजार रुपयांचे बक्षिस घेणारी प्रथम विजेती ठरली संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय धुप्पा, जि.नांदेड येथील कु.ऋतुजा पाटील,२१ हजार रुपयांचे बक्षिस घेणारी द्वितीय विजेती ठरली दिगांबरराव बिंदू महाविद्यालयाची कु.धनश्री कदम.तर ११ हजार रुपयांचे बक्षिस घेणारा तृतीय विजेता ठरला शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज जि. कोल्हापूरचा संकेत पाटील.तसेच फिरत्या चुकांचे सांघिक विजेते राजर्षी शाहू विद्यालय लातूर हे ठरले असून स्पर्धेत मुलींनी बाजी मारली आहे.या सर्व विजेत्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्राचार्य संजय सावंत यांच्या संकल्पनेतून भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कै.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या स्मरणार्थ आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या सुटतील काय?’ या ज्वलंत विषयावर पहिली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा दि.२० ते २१ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली. सदरील स्पर्धेत महाष्ट्रातील एकूण ३५ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला होता.महाराष्ट्राचा महावक्ता ठरविणाऱ्या या वादविवाद स्पर्धेचे दि.२० डिसेंबर २०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी पाटील किन्हाळकर हे होते.तर उद्घाटक म्हणून सभापती शिरीष देशमुख गोरठेकर व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत चे अध्यक्ष ॲड.गोविंदराव लामकानीकर,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवानराव दंडवे,सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी जि.प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी जि.प.सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अत्रिक पाटील मुंगल,संचालक रामचंद्र मुसळे,राजेश अंगरवार,ॲड. शिवाजी कदम,माजी नगरसेवक सुभाष पाटील घंटलवार,माजी नगरसेवक सुभाष पाटील कोंडलवार,दत्तात्रय पांचाळ, आनंदराव आनंतवाड,मोहन पाटील यांसह आदींची उपस्थिती होती.यावेळी काही सहभागी स्पर्धकांनी ‘आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या मिटतील काय?” या विषयावर अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही बाजूंनी वैचारिक जागराची पर्वणी दिली.यामुळे उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या स्तुत्य उपक्रमाबाबत व शैक्षणिक प्रगती बाबत आपले मनोगतातून कौतुक केले.तर दुसऱ्या दिवशी दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी उर्वरित सहभागी स्पर्धक व्यक्त झाले.यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.बालाजी कआळवणए हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास भाऊ देशमुख गोरठेकर यांची उपस्थिती होती.ठरवून दिलेल्या विषयावर स्पर्धक विद्यार्थ्यांनी सखोल असे मत व्यक्त केले. आरक्षणामुळे  सामाजिक बदल नक्कीच घडला आहे असे मत काहींनी मांडले.तर आरक्षण मिळून सुद्धा आजही सर्वसामान्य कुटुंबाची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी सुधारली नाही असे मत काहींनी मांडले.सद्या सर्वश्रुत असलेल्या ज्वलंत विषयावर झालेल्या या वादविवाद स्पर्धेने श्रोत्यांना एक वैचारिक पर्वणी उपलब्ध करून दिली होती.झालेल्या चुरशीच्या स्पर्धेच्या निकालाअंती प्रथम विजेती ठरलेल्या कु.ऋतुजा पाटील,द्वितीय विजेती ठरलेल्या कु.धनश्री कदम,तृतीय विजेता ठरलेला संकेत पाटील व फिरते चषक पटकावणाऱ्या राजर्षी शाहू विद्यालय लातूर च्या संघास कैलास देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी स्पर्धेचे परिक्षक पत्रकार बी. आर.पांचाळ,बाबूराव पाटील,साहित्यिक चंद्रकांत चक्रवार व संपादक उत्तम बाबळे यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाहू विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत,मुख्याध्यापक संतोष जगदंबे,के.एन. किनेवाड,राहुल जोंधळे,निलेश चव्हाण व्ही.एन.सर्जे,एच.जी. कुलकर्णी,शेख सलीम यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर‌मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.श्रोते व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेल्या या स्पर्धेचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहूल जोंधळे आणि निलेश चव्हाण यांनी केले.

प्रथम व द्वितीय विजेत्या कु.ऋतुजा पाटील व कु.धनश्री पाटील यांचे संपादक उत्तम बाबळे यांनी अभिनंदन करुन भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या…

सर्व फोटो सौजन्य – नरेंद्र कृपा फोटो,भोकर 


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !