भोकर येथील प्रसिद्ध व्यापारी खाजा नाजिमोद्दीन इनामदार यांचे दु:खद निधन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील प्रसिद्ध व्यापारी खाजा नाजिमोद्दीन खाजा अहेमद उरफ दस्तुमियां इनामदार(७३) यांचे दि.२६ जानेवारी रोजी पहाटे ६:०० वाजताच्या दरम्यान राहते घरी बिलाल नगर, रेल्वे स्टेशन रोड भोकर येथे अल्पशः आजाराने दु:खद निधन झाले आहे.
माजी नगरसेवक खाजा तौफिक इनामदार,उद्योजक खाजा अतिख इनामदार,मौलाना खाजा लईक इनामदार यांचे ते वडील होत.खाजा नाजिमोद्दीन इनामदार यांच्यावर दि.२६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता रहेमिंया मश्जिद महंमद नगर,रेल्वे स्टेशन जवळ,भोकर येथे दफनविधी करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात उपरोक्त ३ मुले,मुलगी,सुना,जावई नातवंडे असा मोठा परिवार असून भोकर येथील प्रसिद्ध औषधी व्यापारी खाजा खुदबोद्दीन इनामदार,किराणा व्यापारी खाजा फेरोज इनामदार यांचे ते बंधू होत.
त्यांना संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली!