भोकर येथील एका व्यापाऱ्याच्या घरातील ९२ हजाराचा ऐवज चोरला
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अष्टविनायक नगर भोकर येथील एक प्रतिष्ठित व्यापारी आपल्या मुलांना भेटण्यासाठी सहकुटूंब बाहेरगावी गेल्याचे हेरुन दि.१० सप्टेंबर रोजी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील काही रोख रक्कम व सोने चांदीच्या पुजेच्या वस्तू असा ९२ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला असून या प्रकरणी दि.११ सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अष्टविनायक नगर भोकर येथील प्रतिष्ठित व्यापारी महेश प्रभाकर चक्रवार हे घरास कुलूप लाऊन आपल्या मुलांना भेटण्यासाठी नांदेड येथे गेले असता दि.१० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ८:०० वाजता ते दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७:४५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरी कोणीपण नसल्याचे हेरुन काही चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन कपाटातील रोख ३० हजार रुपये व ६२ हजार रुपयाच्या सोने-चांदीच्या पुजेच्या वस्तू असा एकूण ९२ हजार रुपयाचा किमती ऐवज चोरुन नेला.महेश चक्रवार हे घरी परत आल्याने त्यांच्या हे निदर्शनास आले. झालेल्या या चोरीच्या प्रकाराबाबत त्यांनी दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी भोकर पोलीसात रितसर तक्रार दिली.यावरुन सहा.पो.नि.रसूल तांबोळी यांच्या आदेशाने सहा.पो.उप.नि. एस.आय.देवकांबळे यांनी गुरनं.३५२/२०२२ कलम ४५७, ३८० भादवि प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी लक्षटवार हे पुढील अधिक तपास करत आहेत.