भोकर येथील उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रमिजोद्दीन इनामदार यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा भोकर येथे दि.१४ जानेवारी रोजी पालक मेळावा घेण्यात आला व यावेळी सर्वानुमते शाळेच्या व्यवस्थापन समितीची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सदरील समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे भोकर शहराध्यक्ष तथा पालक रमिजोद्दीन उर्फ खाजू तकियोद्दीन इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.उर्वरित जंबो कार्यकारिणीच्या पदांसाठी शहरातील अनेक मान्यवर पालकांची निवड करण्यात आली असून नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होणे,पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणे,शाळेचा विविधांगी विकास करणे व अडचणी सोडविणे,एकूणच शालेय व्यवस्थापनावर अंकुश रहावा म्हणून पालकांचा समावेश असलेल्या शालेय व्यवस्थापन समितीची शासनाने निर्मिती केली आहे.याच अनुषंशाने शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची निवड केली जाते.जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,भोकर येथे दि.१४ जानेवारी २०२३ रोजी या शाळेतील पालकांचा मेळावा पंचायत समिती शिक्षण विभाग भोकर व शाळेच्या वतीने घेण्यात आला.यावेळी जेष्ठ नागरिक मियां पटेल,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक शेख जवाजोद्दीन बरबडेकर,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शिरसाट,केद्रीय मुख्याध्यापक पसनुरवार,केद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक शेख जकियोद्दीन बरबडेकर,शेख रज्जाक शेख, मजहर शेख,शेख अर्शद,मन्सूर खान पठाण,अमजद फारुखी, ॲड.मुजाहेद,डॉ.मकसूद अली,नुसरत इनामदार,एम.डी.इम्रान शेख,इरफान इनामदार,बासिद खतीब यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालक व उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत १८ सदस्यांचा समावेश असलेली शालेय व्यवस्थापन समितीची जंबो नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.यावेळी समिती व समितीच्या कार्यप्रणाली विषयी केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक शेख जकियोद्दीन बरबडेकर यांनी मार्गदर्शन केले.
निवडण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी रमिजोद्दीन उर्फ खाजू तकियोद्दीन इनामदार यांची निवड करण्यात आली.तर उर्वरित कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे.उपाध्यक्ष-सऊद गोंदवाले,पदसिद्ध सचिव मुख्याध्यापक,तर सन्माननिय सदस्यपदी
अब्दूल माजीद अब्दूल गफ्फार,अब्दूल हकीम अब्दूल करीम, सय्यद जाकेर अली ईनामदार,शफी पटेल,शेख एजाजोद्दीन बरबडेकर,तन्हार बेगम खाजा ईरफानोद्दीन ईनामदार,शेख निजाम बाबा,निलोफर बेगम शेख मसूद शेख महेबूब,रेश्मा बेगम नुसरत अली,आसीया बेगम मजरोद्दीन,मोहसिना बेगम शेख रहीम,सय्यद ताजोद्दीन मुनीरोद्दीन,अब्दूल मुख्तार अब्दूल हमीद,अफरोज खाॅन जब्बार खाॅन आणि शिक्षण तज्ञपदी अमजद फारूकी यांची निवड करण्यात आली.तसेच निवडण्यात आलेल्या नुतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा माजी अध्यक्ष अब्दुल माजीद (लाला)अब्दुल गफ्फार,उपाध्यक्ष शफी पटेल यांनी यथोचित सत्कार केला व उपस्थित मान्यवर आणि पालकांनी अभिनंदन करुन भावी सेवाकार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.