भोकर मनसेच्या शिबिरात ५४ दात्यांनी केले रक्तदान
मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे याच्या वाढदिवसाच्या औचित्याने करण्यात आले होते आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने भोकर तालुका व शहर शाखा मनसे च्या वतीने दि.१४ जून रोजी भोकर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून यात ५४ दात्यांनी रक्तदान करुन राज ठाकरे यांच्या प्रति प्रेम भावना व्यक्त केली आणि सामिजिक बांधिलकी व दायित्व ही जोपासले आहे.
जिल्हा व राज्यात रक्त तुटवड्याचे प्रमाण खुपच वाढले असून अनेक रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज आहे.’रक्तदान हेच श्रेष्ठ दान !’ हे ब्रीद खुपच मौलीक बाब दर्शविते. रक्तदानातून जीवनदान देता येऊ शकते म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने भोकर तालुका व शहर मनसे शाखेच्या वतीने दि.१४ जून २०२२ रोजी मनसे भोकर शहर शाखा कार्यालयासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून मनसे सैनिकांसह दिव्यांग बांधवांनी देखील रक्तदान केले.५४ दात्यांनी रक्तदान करुन राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिसाची एक आगळी वेगळी भेट दात्यांनी दिली आहे. तसेच यातून राज ठाकरे यांच्या प्रति प्रेम भावना व्यक्त करुन सामिजिक बांधिलकी व दायित्व ही जोपासले आहे.सदरील दात्यांचे रक्तसंकलन श्री हुजूर साहेब रक्त पेढी नांदेड च्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. रक्तदाते,संकलनकर्ते व सहकार्य कर्ते या सर्वांचे भोकर तालुका मनसे अध्यक्ष साईप्रसाद जटालवार,शहर प्रमुख आकाश गेंटेवार यांनी आभार व्यक्त केले असून शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकरचे अधीक्षक डॉ.अशोक मुंडे,डॉ.साईनाथ वाघमारे व आदी मान्यवरांनी या शिबिरास भेट दिली आणि त्यांच्या हस्ते रक्त दात्यांना प्रमाणपत्र देण्यात येऊन आयोजकांनी ऋण व्यक्त केले आहेत.
तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका व शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी,अंगीकृत सेनेच्या पुजा ताई बनसोडे,गजानन गायकवाड,पवन पवार,राजू कवडे,सुनील पवार,अमृत वाघमारे, अविनाश मेटकर,चंद्रकांत पा.मुस्तापुरे, राहुल बुद्धेवाड, अशोक निळकंठे,केशव पा.आगलावे,विकास वानखेडे यांसह आदींनी परिश्रम घेतले आहेत.