भोकर मनसेच्या वतीने मराठी भाषा विषय शिक्षकांचा सन्मान
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राबविण्यात आला हा स्तुत्य उपक्रम
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मराठी भाषा व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्यात दि.२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.याच औचित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा सन्मान व्हावा असे उपक्रम राबविण्यात यावेत अशा सुचना केल्यावरुन भोकर तालुका व शहर मनसेच्या वतीने शहरातील मराठी,इंग्रजी,उर्दु व अन्य भाषा मााध्यम शाळेत मराठी भाषा विषय शिकविणा-या शिक्षकांचा यथोचित सन्मान करुन मराठी भाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार व शहराध्यक्ष आकाश गेंटेवार यांच्या पुढाकाराने संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुचविल्या प्रमाणे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी ४:३० वाजता मनसे कार्यालयात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.तो असा की,भोकर शहरातील सर्व मराठी,इंग्रजी व उर्दू माध्यमातील शाळेत मराठी भाषा शिकवणारे शिक्षक हे मराठी भाषा विषय शिकवून भाषेचे जतन व संवर्धन करण्याचे महत्वपुर्ण सेवाकार्य करुन मराठी भाषिक पिढी घडवित असल्याने त्यांचा शॉल,पुष्पहार, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.शहरातील बहुतांश मराठी भाषा विषय शिक्षकांचा यात समावेश होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका व शहर शाखा भोकर व अंगीकृत सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी उपस्थित राहून मोठ्या उत्साहात हा उपक्रम साजरा केला.सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी हतालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार,शहराध्यक्ष आकाश गेंटेवार,महिला तालुकाध्यक्षा पुजा ताई बनसोडे,सहकार सेना तालुकाध्यक्षचं द्रकांत पाटील मुस्तापुरे,तालुका उपाध्यक्ष राहुल बुद्धेवाड,अशोक निळकंठे, शहर उपाध्यक्ष राजू कवडे,मनविसे शहराध्यक्ष पवन पवार,ओमप्रसाद अन्नरवाड,लक्ष्मीकांत शिरमोड, व्यंकट खंडागळे यांसह सर्व आजी माजी पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य शिक्षक व प्रतिष्ठीत नागरीक आणि मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.