भोकर मध्ये वंचित आघाडीने चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा केला निषेध
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : एका कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ.आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.त्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून याच अनुषंगाने दि.१० डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ना.चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला थोडे मारुन तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

या देशात शाळा सुरू कुणी केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरू केल्या.या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली व शाळा चालू केली,असे वादग्रस्त वक्तव्य ना.चंद्रकांत पाटील यांनी केले होते.या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या.हे वक्तव्य महामानवाच्या अवमान करणारे व निषेधार्थ असल्यामुळे दि.१० डिसेंबर २०२२ रोजी भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या निषेधार्थ अनेक घोषणा दिल्या व त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारुन तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला.या निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे भोकर तालुकाध्यक्ष सुनील कांबळे,जिल्हा महासचिव शैलेश लवटे, जिल्हा सदस्य लक्ष्मण पांचाळ,ललित पटेल, तालुका महासचिव सुमेश फुगले,साईनाथ हामंद, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण,बालाजी बाभळे,शेख शब्बीर, पुंजाराम डोखळे,शहराध्यक्ष शेख अजीम,महिला अध्यक्षा अनिताताई वाघमारे, यशोदाबाई महाबळे, द्वारकाबाई कांबळे,कांताबाई कांबळे,बाबुराव गाडेकर,अंकुश चव्हाण,श्रीनिवास कदम,राजू दांडगे,गजानन ढोले,सुभाष तेले, तथागत चंद्रे,रमेश लोमटे,हिरामण कांबळे,सिद्धार्थ चंद्रे,राजू गजभारे,तुळशीराम कदम,मधुकर तारू, साहेबराव जाधव,माधवराव लोखंडे,जळबा शिरसागर,मारुती वाघमारे,केशव हनवते,गंगाधर कदम,बाबुराव तोडे,संजय जंगमे,ज्ञानू चव्हाण, कपिल खंदारे,राहुल अप्पा चौंदते,सतीश जाधव यांसह असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते व विचार अनुयायी सहभागी झाले होते.