Sun. Dec 22nd, 2024

भोकर मध्ये भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महान योद्यांना दिली जाणार मानवंदना

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे दि.१ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज आणि पेशवा यांच्यात लढाई झाली होती.यावेळी इंग्रज लष्करातील महार बटालीयनच्या शूर योद्यांच्या बळावर इंग्रजांनी पेशव्यांना हरवले होते.त्यांच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे इंग्रजांनी विजयस्तंभ बांधला आहे.या ठिकाणी प्रतिवर्षी त्या शूर योद्यांना आंबेडकरी चळवळीतील विचार अनुयायी मानवंदना देऊन शौर्य दिन साजरा करतात.याच औचित्याने भोकर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.१ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यातून त्या महान योद्यांना मान वंदना दिली जाणार आहे.
कोरेगाव भीमा या ठिकाणी दि.१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये ऐतिहासिक घनघोर युद्ध झाले होते.महार बटालियनच्या बळावर इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात ते युद्ध पुकारले होते.त्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा दारुण पराभव केला होता.यात अनेक योद्धे शहीद ही झाले.हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्या नंतर त्या योद्यांच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे एक विजयस्तंभ बांधला.कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता.या ऐतिहासिक घटनेस दि.१ जानेवारी २०२४ रोजी २०६ वर्ष पूर्ण होत आहेत.तर दि.१ जानेवारी १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन महान योद्यांचा इतिहास पुढे आणला.तेव्हापासून या ठिकाणी ‘शौर्य दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.
याच शौर्य दिनाच्या औचित्याने वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर शाखा भोकर च्या वतीने दि.१ जानेवारी २०२४ रोजी भोकर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठिक ८:३० वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.या रॅलीचा प्रारंभ सुभेदार रामजी आंबेडकर चौक भोकर येथून होणार आहे.तर आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने येणाऱ्या सदरील रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे होणार आहे.रॅलीच्या समारोपानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी महान योद्यांना मानवंदना दिली जाणार आहे.यानंतर त्याच ठिकाणी सकाळी १०:३० वाजता सुप्रसिद्ध गायक संतोष मंत्री व त्यांच्या संचाचा योद्यांची शौर्यगाथा व भीमगितांचा संगितमय कार्यक्रम होणार आहे.यावेळी उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर व प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा उपाध्यक्ष केशव मुद्देवाड यांसह जिल्हा व तालुका स्तरीय आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे व बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे भोकर तालुकाध्यक्ष दिलीप के.राव,तालुका सचिव व्यंकट वाडेकर, भोकर शहराध्यक्ष शेख रहीम यांसह आदींनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !