भोकर मध्ये पल्स पोलीओ लसीकरण मोहीम संपन्न
वय ० ते ५ वर्षे वयोगटातील ४,५८८ अपेक्षित लाभार्थी बालकांपैकी ४,३३६ बालकांना पाजविण्यात आली पोलीओ लस
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम दि.२७ फेब्रुवारी रोजी भोकर शहरात ग्रामीण रुग्णालय भोकरच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरातील २५ बुथ ठिकाणी ३ ट्राझिंट टिम व १ मोबाईल टिम करून राबविली आणि पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वी केली.
भोकर शहरात वय ० ते ५ वर्षे वयोगटातील ४,५८८ अपेक्षित लाभार्थी बालके असून त्यापैकी ४,२१६ (९१.८९ टक्के),ट्राझिंट टिम व मोबाईल टिम कडून १२० बालके असे एकुण ४,३३६ बालकांना पोलीओ लस पाजविण्यात आली. डॉ.सुनील पल्लेवाड जिल्हा स्तरीय अधिकारी यांनी काही बुथ ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व काही बुथवर पोलीओ लस ही त्यांनी पाजविली.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी,डॉ.अनंत चव्हाण,डॉ.व्यंकटेश टाकळकर,डॉ. अविनाश गुंडाळे,डॉ.मुद्दशीर,डॉ.थोरवट,डॉ.ज्योती यन्नावार, डॉ.अपर्णा जोशी,आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, गंगामोहन शिंदे, संदिप ठाकूर,गिरी,रावलोड,औषध निर्माण अधिकारी पांडुरंग तम्मलवाड,नामदेव कंधारे,आरोग्य कर्मचारी सुरेश डुम्मलवाड,परिचारिका श्रीमती नवघडे, श्रीमती भवरे,निलोफर पठाण, दिपके,सुनिता ताटेवाड, बोड्डेवाड,संगिता महादळे, अधिपरीचारीका श्रीमती सरस्वती दिवटे,मुक्ता गुट्टे,संगिता पंदीलवाड,आरोग्य सेविका भिसे, सुर्वणकार,भोळे,माया आडे, गजानन,बबलू चरण,हत्तीरोग कर्मचारी विठ्ठल मोरे,रामराम जाधव,गणेश गोदाम,इंदल चव्हाण,राजू चव्हाण,रविंद्र चव्हाण,पांडुरंग खोकले,हराळे, वाहनचालक अंकुश राठोड,कदम,गायकवाड,सोहेल,वाठोरे, डाकोरे,अंगणवाडी सेविका,मदतनीस, स्वयंसेवक व राम रतन नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थीनी यांसह आदींनी ही पल्स पोलोओ मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.