भोकर मध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी दोन सार्वजनिक शौचालय उभारणार – राजेश लांडगे
तहसील कार्यालया समोरील एका सार्वजनिक शौचालय इमारतीचे झाले भूमिपूजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरात ये जा करणाऱ्या महिला व नागरिकांना सार्वजनिक शौचालय उपलब्धते अभावी खुप त्रास सहन करावा लागतो.ही गरजेची बाब लक्षात घेऊन भोकर नगर परिषदेच्या वतीने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत बीओटी तत्त्वावर दोन सार्वजनिक शौचालय इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून अल्पावधीत एका सार्वजनिक शौचालय इमारतीचे बांधकाम पुर्णत्वास येईल व दुसरे ही लवकरच उभारण्यात येईल,अशी माहिती भोकर चे तहसिलदार तथा भोकर नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश लांडगे यांनी येथील तहसील कार्यालयासमोर बांधण्यात येत असलेल्या एका सार्वजनिक शौचालय इमारतीच्या भूमिपुजन प्रसंगी दिली.
भोकर शहरातील नागरिकांसह शहरात ये जा करणाऱ्या महिला व नागरिकांची मोठी संख्या असून सार्वजनिक शौचालय येथे उपलब्ध नसल्याने पुरुष मंडळी आपल्या लघुशंकेची बाब मिळेल त्या ठिकाणी उरकून घेतात.परंतू महिलांना मात्र या अभावी मोठा त्रास सहन करावा लागतो.ही बाब भोकर शहर विकासाच्या पटलावर मान खाली घालविणारे होती.जसे की, तहसिल कार्यालय इमारतीच्या समोरच अनेकांनी मुतारी करुन दुर्गंधी पसरविली होती.याच प्रकारे अनेक ठिकाणी ही मुतारीचे स्वरूप आले आहे.त्यामुळे येथील अनेक प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार व आदींनी शहरातील मुख्य रस्त्यालगत सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावेत अशी मागणी सातत्याने केली होती.याची दखल घेऊन तहसिलदार राजेश लांडगे यांनी तहसिल कार्यालयासमोरील त्या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा प्रस्ताव नगर परिषदेकडे पाठविला होता.तसेच त्यांच्या पाठपुराव्यावरुन यास सर्व संबंधितांकडून बीओटी तत्त्वावर दोन सार्वजनिक शौचालय इमारती उभारण्याची मंजूरी मिळाली.यावरुन भोकर नगर परिषदेने दोन सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेतल व दि.९ नोव्हेंबर २०२३ रोजी तहसिल कार्यालयासमोर बांधण्यात येणार असलेल्या एका सार्वजनिक शौचालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा संपन्न झाला.
तहसिलदार तथा भोकर नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश लांडगे यांच्या हस्ते या सार्वजनिक शौचालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी काँग्रेस कमिटीचे भोकर तालुका अध्यक्ष भगवानराव दंडवे,भोकर शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू इनामदार,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,विनोद चव्हाण,दिलीप तिवारी, मंडळाधिकारी शेख मुसा सरवर,तलाठी महेश जोशी,नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जावेद इनामदार, सदरील शौचालय इमारतीचे संचालक तथा कंत्राटदार सुरेश लोट यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना तहसिलदार राजेश लांडगे पुढे म्हणाले की,सार्वजनिक शौचालय हे अतिशय गरजेची बाब असून या शौचालयाचे दोन महिन्यांच्या आत लोकार्पण करण्यात येईल.तसेच यानंतल लवकरच पंचायत समिती कार्यालयासमोर बीओटी तत्त्वावरील दुसरे एक सार्वजनिक शौचालय उभारण्यात येईल.सदरील इमारत भूमिपूजन सोहळ्याचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गुंडूले यांनी मानले.