Mon. Dec 23rd, 2024

भोकर मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरी झाली भरदिवसा चोरी

Spread the love

दाराचे कुलूप तोडून घरातील ३६ हजाराचा ऐवज चोरला

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : विश्वकर्मा नगर भोकर येथील एक व्यापारी बाहेरगावी गेल्याचे पाहून दि.३ ऑक्टोबर रोजी भरदिवसा त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ३६ हजार रुपयाचा ऐवज चोरला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भोकर पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी बाबुराव कोंडावार(५१) रा.डौर ता.भोकर ह.मु. विश्वकर्मा नगर भोकर हे दि.३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी आपल्या कुटूंबियांसह बाहेर गावी गेले असता सकाळी ११:०० ते ११:३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोट्यांनी घरात प्रवेश केला व कपाट उघडून कपाटातील रोख २० हजार रुपये आणि १६ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ३६ हजार रुपयाचा ऐवज चोरुन चोरट्यांनी पोबारा केला.सदरील व्यापारी आपल्या कुटूंबीयांसह बाहेर गावाहुन घरी परत आले असता त्यांच्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी भोकर पोलीस ठाणे गाठले व रितसर फिर्याद दिली.यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुरनं ३७८/२०२२ कलम ४५४,३८० भादवि प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जाधव हे पुढील अधिक तपास करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !