Mon. Dec 23rd, 2024

भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत १२ पोलीसांना मिळाली पदोन्नती

Spread the love

नांदेड जिल्हा पोलीस दलातील ३८४ पोलीसांना पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सेवाजेष्ठतेनुसार दिली पदोन्नती

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलातील ३८४ पोलीस अंमलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार नुकतीच पदोन्नती जाहीर केली असून भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत चौघांची सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी व आठ जणांची पोलीस जमादार पदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलात आनंद व्यक्त होत असून भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी या पदोन्नत पोलीस बांधवांना दि.६ सप्टेंबर रोजी स्टार व पट्टी लाऊन,पुष्पहार देऊन,पेढे भरवून अभिनंदन केले आहे.तसेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही या सर्वांचे अभिनंदन करुन भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पदोन्नती समितीच्या दि.६ ऑक्टोबर २०२१ व दि.३० ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या निर्णयानुसार पोलीस अमलदार यांना सेवा जेष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आल्याचे परिपत्रक नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी निर्गमित केले असून नांदेड जिल्हा पोलीस दलातील ३८४ पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.या पदोन्नत पोलीसांचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी अभिनंदन करून भाविक सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तर भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत पोलीस अमलदारांतील चौघांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी व आठ जणांची पोलीस जमादार पदी पदोन्नती झाली असल्याचा त्यात समावेश असून त्या पदोन्नत पोलीसांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
पोलीस जमादार संभाजी देवकांबळे(एच.सी.१६५३), दिलीप जाधव(एच.सी.१७७६),संभाजी हानवते(एच. सी.१७६५), सतिश लेकुळे(एच.सी.४३३) या चौघांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे.तर पोलीस नायक राजेश धुताडे(एन.पी.सी. २२५८),नामदेव जाधव(एन.पी.सी. २४०१),देवानंद कदम(एन.पी.सी.२५२९),सोनाजी कानगुले (एन.पी. सी.११५३),विठ्ठल ढोले(एन.पी.सी.४४),शिवाजी पवार (एन.पी.सी.२६९१),दिपक कंधारे(एन.पी.सी.८१२), व्यंकटेश आलेवार(एन.पी.सी.९८८) या आठ जणांची पोलीस जमादार पदी पदोन्नती झाली आहे.

भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत या १२ जणांची पदोन्नती झाली असल्याने आनंद व्यक्त होत असून दि.६ सप्टेंबर २०२२ भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे,पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटील,महिला पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांच्या हस्ते उपरोक्त पदोन्नत पोलीसांना स्टार व पट्टी लावण्यात आली.तसेच पुष्पहार देऊन,पेढ भरवून अभिनंदन करण्यात आले.यावेळी पोलीस उप निरीक्षक सुर्यकांत कांबळे,पोलीस उपनिरीक्षक आर.एन.कराड,पोलीस जमादार संजय पांढरे,पो.कॉ.ज्ञानेश्वर सरोदे,पो.कॉ.विकास राठोड यांसह आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करुन भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व पदोन्नत पोलीस बांधवांचे संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि भावी सेवाकार्यासाठी मनस्वी शुभेच्छा!!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !