Mon. Dec 23rd, 2024

भोकर पोलीसांनी ८ जीवंत गोवंशासह २ क्विंटलच्यावर गोवंशमांस पकडले

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : नांदेड वळण रस्ता परिसरातील भोकर शहरातील खाजा नगर येथे बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी आणण्यात आलेल्या ८ जीवंत गोवंशासह २ क्विंटलच्यावर गोवंशमांस पकडण्यात भोकर पोलीसांना यश आले असून दि.२९ जून रोजी दोघांविरुद्ध भोकर पोलीसात गोवंश हत्त्या बंदी कायदाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बकरी ईद च्या दिवशी कुर्बानीसाठी भोकर शहरातील म्हैसा-नांदेड वळण रस्ता परिसरातील खाजा नगर येथे गोवंश आणले असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलीसांना मिळाल्यावरुन दि.२९ जून २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.राम कराड व अन्य पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा ताफा खाजा नगर परिसरात गेला.यावेळी शेख इसाक शेख रसूल यांच्या घराच्या बाजूस असलेल्या शेख बशीर शेख शादुल्ला यांच्या प्लॉटवर ८ जीवंत गोवंश व गोवंशमांस आढळून आले.काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना व पो.नि.नानासाहेब उबाळे,पो.नि.दिगांबर पाटील,पो.उप. नि.अनिल कांबळे,महिला पो.उप.नि.राणी भोंडवे, जमादार नामदेव जाधव,पो.कॉ.ज्ञानेश्वर सरोदे,पो.कॉ. विकास राठोड,यांसह आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहचला.पशू वैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात येऊन उत्तरीय तपासणीसाठी गोवंशमांसाचे नमुने घेण्यात आले. तसेच घटनास्थळी मिळालेले जवळपास २ क्विंटलच्यावर गोवंशमांस नगर परिषद भोकर च्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ताब्यात घेण्यात आले व जीवंत ८ गोवंश ही ताब्यात घेण्यात आले.यात दोन गाईंचा ही समावेश आहे.मिळालेले गोवंशमांस हे जवळपास ३ गोवंशाचे असावे असे सांगण्यात आले असून मा.भोकर न्यायालयाच्या आदेशाने ते नष्ट करण्यात आले आहे व जीवंत मिळालेल्या त्या ८ गोवंशाची सुरक्षित पणे वाकद ता.भोकर येथील गोशाळेत पाठवणी करण्यात आली आहे.

पोलीसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल होताच कुर्बानीसाठी ते गोवंश विक्री करणारे व खरेदी करणाऱ्या मंडळींनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला असला तरी सलमान हबीब कुरेशी रा.खाजा नगर,भोकर या कसायास व प्लॉट मालक शेख बशीर शेख शादुल्ला,रा.म्हैसा रोड भोकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले.तसेच पो.उप.नि.राम कराड यांनी दिलेल्या सरकारी फिर्यादीवरून गोवंश हत्त्या बंदी कायदा प्रमाणे गु.र.नं. २३३/२०२३ कलम ५,५ क,६,७,९,९ अ नुसार उपरोक्त दोघांविरुद्ध भोकर पोलीसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. नानासाहेब उबाळे हे करत असून घटनास्थळी भोकर चे अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी भेट दिली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !