भोकर पोलीसांनी ‘तिसऱ्या’दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या
त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ८ दुचाकी केल्या हस्तगत
अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : गेल्या काही दिवसांपासून भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधार्थ एक पोलीस पथक नियुक्त करण्यात आले.या पथकाने दोन महिन्याच्या दरम्यान दोन दुचाकी चोरांना अटक करुन त्यांच्याकडून अनेक दुचाकी हस्तगत केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच या पथकास अन्य एका दुचाकी चोराच्या मुसक्या आवळण्यास यश आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मागील काही दिवसापासून भोकर व परिसरातून दुचाकी चोरीस जाण्याचे गंभीर प्रकार वाढल्याने भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी जमादार दिलीप जाधव,जमादार माधव पाटील,ना.पो.कॉ. व्यंकट आलेवार यांचा समावेश असलेले एक गुन्हे शोध पथक नेमले.या पथकाने दोन दुचाकी चोर व त्यांच्याकडून अनेक दुचाकी हस्तगत केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच या पथकाने शेख आयास शेख बरकत अली(३०)रा.के.आर.के. कॉलनी आदिलाबाद(तेलंगणा राज्य) या दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या.त्यास अटक करुन अधिक चौकशी केली असता त्यांने गुन्हयाची कबुली दिली.तसेच त्याने चोरलेल्या जवळपास २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ८ दुचाकी या पथकास काढून दिल्या आहेत.
त्या दुचाकी बाबद गुन्हे नोंद असलेले पोलीस ठाणे व दुचाकींचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.पोलीस ठाणे भाग्यनगर नांदेड येथील गु.र.नं.४०४/२०२१ कलम ३७९ भा.द.वि. मधील दुचाकी क्र.एम.एच.२६ ए.एम.९९१९, पोलीस ठाणे विमानतळ नांदेड येथील गु.र.नं.१५४/२०२१ कलम ३७९ भा.द.वि.मधील स्प्लेंडर प्रो क्रं.एम.एच.२६ ए.वाय.९०६४,पोलीस ठाणे भोकर येथील गु.र.नं.४१६/ २०२१ कलम ३७९ भा.द.वि.मधील ड्रीम युगा क्रं.एम.एच. २६ ए.जी.०६३०,पोलीस ठाणे ईस्लापुर येथील गु.र.नं.०१/ २०२२ कलम ३७९ भा.दं.वि.मधील स्प्लेडर प्लस क्रं.एम. एच.२६ वाय ४८०८,तसेच तेलगणा राज्यातील म्हैसा व तामसा येथील ०२ दुचाकी आणि इतर राज्यातील ०२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.तर नमुद गुन्हयाचा तपास भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप जाधव हे करीत आहेत.
