Mon. Dec 23rd, 2024

भोकर तालुक्यात वीज अटकाव यंत्रणा उभी करा-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

Spread the love

वीज पडून होणाऱ्या मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र 

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : मागीलवर्षी भोकर तालुक्यात वीज पडून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी व कष्टकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले.त्या पिडीत कुटूंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.ते होऊ नये व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भोकर तालुक्यात वीज अटकाव यंत्रणा उभी करावी,अशी मागणी एका पत्राद्वारे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

संचालक रामचंद्र मुसळे यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन आ.अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले पत्र

भोकर तालुक्यातील पिंपळढव,सोनारी,थेरबन,पाळज, देवठाणा,भोसी,पांडुरणा व आदी गाव परिसरात मागील वर्षी आणि गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत जवळपास वीज पडून शेतात काम करणाऱ्या तब्बल १३ शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.भविष्यात अशा घटना होऊ नयेत व त्या टाळण्यासाठी राज्य शासनातर्फे उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी एका निवेदनाद्वारे स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे जेष्ठ संचालक रामचंद्र मुसळे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल त्यांनी घेतली व वीज प्रवण क्षेत्रात उपाययोजनेस्तव वीज अटकाव यंत्रणा उभी करण्यात यावी अशा मागणीचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले असून तात्काळ नियमानुसार शासनस्तरावर या मागणीची अंमलबजावणी करावी असे ही त्यांनी म्हटले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !