Mon. Dec 23rd, 2024

भोकर तालुक्यात नव्या जोमाने शिवसेना उभी करु-नागेश पाटील आष्टीकर

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्ववजी ठाकरे यांना माणणा-या शिवसैनिकांची संख्या भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे मी स्वतः प्रत्येक गावात भेट देईन व गाव,शहर व तालुका शाखांचे पुनर्गठन करुन तालुक्यात नव्या जोमाने शिवसेना उभी करु, असे मनोगत नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले.शिवसेनेच्या वतीने भोकर येथे दि.१ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्या प्रसंगी सत्कारमुर्ती म्हणून ते बोलत होते.

हदगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख पदी नियुक्ती झाल्याने भोकर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने दि.१ सप्टेंबर २०२२ रोजी माऊली मंगल कार्यालय भोकर येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नागेश पाटील आष्टीकर यांचा भोकर येथील हा प्रथम दौरा असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे त्यांचे भव्य स्वागत करुन ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत त्यांना माऊली मंगल कार्यालयात आणण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज,हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर भोकर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात येऊन उपस्थितांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.यानंतर जेष्ठ शिवसैनिक शिवाजीराव पाटील किन्हाळकर,अ‍ॅड.परमेश्वर पांचाळ,माजी शहर प्रमुख माधव पाटील वडगावकर,आनंदीबाई चुनगुरवाड यांसह तालुका,शहर शाखा व महिला आघाडीच्या शिवसैनिकांनी नागेश पाटील आष्टीकर यांचा सामुहिक भव्य सत्कार केला आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडी युवाचे तालुकाध्यक्ष माधव करेवाड,सोनारी येथील भाजपचे उपशाखाध्यक्ष भीमराव क्यातमवाड,भोकर येथील उद्धव पाटील ढगे यांसह आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुखांनी त्यांचा सत्कार करून शिवसेनेत स्वागत केले.

तर सत्कारमुर्ती म्हणून बोलतांना नागेश पाटील पुढे म्हणाले की,भोकर तालुक्यात निष्ठावान शिवसैनिकांची मोठी फळी आहे.त्यामुळे येथील शिवसेना अभेद्य आहे.म्हणून मी गाव पातळीपर्यंतच्या शिवसैनिकांची भेट घेणार आहे.हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,अशी मी ग्वाही देतो व त्यासाठी आपली साथ असेलच असा मला विश्वास आहे,असे ही ते म्हणाले.सदरील सत्कार सोहळ्यास बहुसंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.या सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार तालुका उपप्रमुख बालाजी यलपे यांनी केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !