भोकर तालुक्यातील वंचित ब.आघाडी ग्रामशाखा नामफलकांचे अनावरण संपन्न
नांदेड येथे होत असलेल्या भव्य धम्म मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे राजेश्वर हत्तीअंबिरे आणि सुनिल कांबळे यांनी केले आवाहन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सुनिल कांबळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या भोकर तालुकाध्यक्षपदी फेर निवड झाल्यापासूनच पक्षवाढीने वेग घेतला आहे.त्यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अनेक ग्रामशाखांची बांधणी मोठ्या प्रमाणात होत असून २५ ग्रामशाखाची बांधणी नव्याने झाली असून जिल्ह्याध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबिरे पालमकर यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच वागद,आमदारी,नारवाट यासह आदी ग्रामशाखांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले आहे.तर या औचित्याने भोकर येथे एक व्यापक बैठक घेण्यात आली यावेळी राजेश्वर हत्तीअंबीरे व सुनिल कांबळे यांनी नांदेड येथे होत असलेल्या भव्य धम्म मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते पक्षवाढीसाठी काम करत आहेत.याच अनुशंगाने काम करत असलेल्या सुनिल कांबळे यांच्या पक्षकार्याची दडल घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या भोकर तालुकाध्यक्षपदी वरीष्ठांनी फेर निवड केली.यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले व ग्रामशाखांची बांधणी मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यांनी अवघ्या काही दिवसात तालुक्यातील २५ ग्रामशाखांची नव्याने बांधणी केली आहे.त्यापैकी काही ग्रामशाखांच्या नाम फलकांच्या अनावरणाच्या व नांदेड येथे दि.५ नोव्हेंबर २०२२ रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी १२:०० वाजता होत असलेल्या भव्य धम्म मेळाव्याच्या निमित्ताने दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी वंचित बहुजन आघाडीचे नुतन जिल्ह्याध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबिरे प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि महासचिव शैलेश लवटे,माजी जिल्ह्याध्यक्ष प्रशांत इंगोले,युवा प्रदेश कार्यकरणी सदस्य अक्षय बनसोडे,प्रा.बलभीम वाघमारे,भोकर तालूकाध्यक्ष सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह भोकर येथे एक व्यापक बैठक घेण्यात आली.
सदरील बैठकीत पक्षवाढीचा आढावा घेण्यात आला.पक्षवाढीचे काम पाहून जिल्हाध्यक्ष व उपस्थित मान्यवरांनी तालुकाध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.तसेच अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे होत असलेल्या धम्म परिषदेच्या प्रचार प्रसाराच्या अनुशंगाने भारतीय बौद्ध महासभा शाखा भोकरचे शहराध्यक्ष साहेबराव मोरे व सुनिल कांबळे यांनी तालुक्यात घेतलेल्या बैठकांचा आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबीरे व तालुकाध्यक्ष सुनिल कांबळे यांनी नांदेड येथे होत असलेल्या धम्म मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
याचबरोबर तालुक्यातील वागद,आमदारी,नारवाट यासह आदी ग्रामशाखांच्या नाम फलकाचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबिरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी उपरोक्त मान्यवरांसह तालुकाध्यक्ष सुनिल कांबळे, महासचिव सुमेश फुगले,साईनाथ हामंद,उपाध्यक्ष शेख शबीर,चंद्रकांत चव्हाण, पुंजाजी डोखळे,महिला अध्यक्षा अनिता वाघमारे,बालाजी बाभळे,मारोती राजेमोड,गजानन ढोले,सम्यक चौदंते,चंद्रकांत धमसे,मारोती वाघमारे, शेख अजीम,अंकुश चव्हाण,यशवंत जाधव,श्रीनिवास कदम,गजानन साखरे,शेख आरशद,मधुकर तारू,तुळशीराम कदम,राजू गजभारे, संभाजी क्षिरसागर यांसह तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.