भोकर तालुक्यातील ग्रामपंच्यायतींवर आ. अशोक चव्हाणांचा झेंडा
कोळगावच्या सरपंच पदाच्या कारभारी झाल्या राधाबाई पानेवार ; तर चिंचाळा प.भो.चा कारभार रत्नामाला कापरवार यांच्याकडे आणि नांदा खु.चा कारभार सुमित्रा जाधव यांच्या हाती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यातील मौ.कोळगाव बु., चिंचाळा प.भो.आणि नांदा खु.ह्या तीन गावांच्या ग्रामपंचायतींची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून थेट जनतेतून सरपंच पदासाठी मतदान झाल्याने ही लढत चूरशीची झाल्याचे निदर्शनास आले आहे.या लढतीत कोळगाव बु. च्या सरपंच पदाच्या कारभाराची माळ राधाबाई पानेवार यांच्या गळयात पडली असून चिंचाळा प.भो.चा कारभार रत्नमाला कापरवार आणि नांदा खु.चा कारभार सुमित्रा जाधव यांच्या हाती मतदारांनी दिला आहे.तर ह्या तीन ही ग्रामपंचायतींवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (काँग्रेस पक्षाचा) यांचा झेंडा लागला आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.१८ डिसेंबर २०२२ मतदान झाले व दि.२० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यातील उपरोक्त तीन ग्रामपंचायतींचा समावेश होता.झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडायचा होता. त्यामुळे मतदारांत नवचैतन्य दिसून आले व लढतीची रंगत ही चूरशिची झाली.आठ सदस्य संख्या असलेल्या मौ.कोळगाव बु.ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी तीन महिला उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात होत्या. झालेल्या निवडणुकीत श्री दत्तकृपा ग्रामविकास पॅनलने विजयश्रीत बाजी मारली असून सरपंच पदाच्या उमेदवारासह सदस्य ही बहुमताने व बहुसंख्येने निवडूण आणत विद्यमान सरपंचांच्या पॅनलला मात दिली.या विजयश्रीत मतदारांनी सरपंच पदाच्या कारभाराची माळ राधाबाई विलास पानेवार(६३५) यांच्या गळ्यात घातली.तर ग्रामपंचायत सदस्य पदाचे विजयी ७ उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.वार्ड क्र.०१- रुक्माबाई सयाजी गामोड (२९५),दत्ता देवन्ना पेंटेवाड (२६७),ज्योती योगेश पोलसवाड,वार्ड क्र.०२- कैलास रामण गायकवाड (२०२),जयमाला मारोती गायकवाड (१८७).तर वार्ड क्र.०३- विठ्ठल भीमा कुचलवाड (१८४),संगीता परमेश्वर सावळे (१७७)
चिंचाळा प.भो.च्या सरपंच पदाचा कारभार रत्नामाला कापरवार यांच्याकडे
चिंचाळा प.भो.च्या सार्वत्रिक निवडणुकीत सेवा समर्पण पॅनलने विजयश्रीत बाजी मारली असून सरपंच पदाच्या विजयश्रीची माळ रत्नमाला केशवराव कापवार(३७४) यांच्या गळ्यात पडली आहे.तर ग्रामपंचायत सदस्य पदाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.वार्ड क्र.०१- नंदा सुदाम ढवळे (१८९), वार्ड क्र.०२- राजू पुंडलिकराव कदम (१०९),भाग्यश्री हनुमंत कदम (१०९),तर वार्ड क्र.०३- संतोष गंगाधर ढवळे (१०४)
नांदा खु.च्या सरपंच पदाचा कारभार सुमित्रा जाधव यांच्याकडे
नांदा खु.च्या सरपंच पदाच्या उमेदवार सुमित्रा गणपत जाधव (३००) ह्या बहुमतांनी निवडणूक आल्या.तर ग्रामपंचायत सदस्य पदांचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.वार्ड क्र.०१- नारायण गणपती निमोड (१२२),शेषप्रकाश नरसिंगराव इरलावाड (१३५),शांताबाई दत्तराव मांजरे (१२२),वार्ड क्र.०२- कल्पना बालाजी कुमरवाड (७५), तर वार्ड क्र.०३- गोविंद मोतीराम राठोड (९२).
सदरील निवडणूक प्रक्रिया सुरळीत व कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली असून ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रेखा चामनर,सय्यद इस्माईल,संजय सोलंकर व निवडणूक विभागाचे अव्व्ल कारखून जी.के.शेळके,महसूल सहाय्यक दिलीप कावळे,संगणक चालक संजय सूर्यवंशी यांनी काम पहिले आहे.तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक पाटील,ए.एल.मादसवार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.एस.मिराशे यांनी काम पहिले आहे.तसेच कायदा शांतता व सुव्यवस्थेसाठी पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदशनाखाली सहा.पो.नि.रसूल तांबोळी,पो.उप.नि. दिगंबर पाटील,पो.उप.नि.अनिल कांबळे,पो.उप.नि. आर.एन.कराड, महिला पो.उप.नि.राणी भांडवे यांसह आदी पोलीस कर्मचारांनी चोख बंदोबस्त ठेऊन परिश्रम घेतले आहेत.
भोकर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आ.अशोक चव्हाणांचा झेंडा
ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष चिन्ह नसल्यमुळे ती ग्रामपंचायत कोणत्या अमुक पक्षाची आहे,असे म्हटल्या जात नाही.परंतु सरपंच पदाचा उमेदवार किंवा पॅनल प्रमुख हे ज्या पक्षाचे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी असतील त्या पक्षाच्या हाती ती ग्रामपंचायत असे म्हटल्या जातं आहे.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार असल्याने भोकर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर त्यांच्याच कार्यकर्त्यांची सत्ता आहे.ग्राम विकासासाठी त्यानी कोट्यावधी रुपयांचा निधी आपल्या मतदार संघात प्राप्त करुन दिला असल्याने झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यातील उपरोक्त तिन्ही गावच्या ग्रामपंचायतींत त्यांचे कार्यकर्ते सरपंच व सदस्यपदी बहुमताने निवडूण आले आहेत.त्यामुळे ह्या तिन्ही ग्रामपंचायतींवर काँग्रेसचाच झेंडा फडकल्याचे बोलल्या जात आहे.
तीन्ही ग्रामपंचायत निवडणूकीतील सर्व विजयी सरपंच व सन्माननिय सदस्यांचे मनापासून अभिनंदन आणि भावी सेवाकार्यासाठी मनस्वी हार्दिक शुभेच्छा! – संपादक