Sun. Dec 22nd, 2024

भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंजि.विश्वंभर पवार व आदींचा केला भव्य सत्कार

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट)उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी पाटील गौड आणि ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी आनंद डांगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.२८ डिसेंबर रोजी भव्य सत्कार करण्यात येऊन पुढील सेवाकार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) उत्तर व दक्षिण नांदेड जिल्ह्याच्या ६ जणांची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नुकतीच नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.त्या नवनियुक्त विशेष निमंत्रित सदस्यांत उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार, भोकर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायकराव कदम देशमुख,किनवटचे माजी नगराध्यक्ष खान इसाखान सरदारखान यांचा समावेश आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी भोकर येथील धडाडीचे युवा नेतृत्व बालाजी पाटील गौड यांची ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी व युवा उद्योजक आनंद डांगे यांची ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केली आहे.उपरोक्त सर्वांच्या नवनियुक्तीच्या संदर्भाने त्यांचा यथोचित सत्कार करण्याच्या हेतूने भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका शाखा भोकर च्या वतीने भोकर येथील संपर्क कार्यालयात दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता इंजि.विश्वंभर पवार,बालाजी पाटील गौड व आनंद डांगे यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांचे सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंजि.विश्वंभर पवार,बालाजी पाटील गौड आणि आनंद डांगे यांचा भव्य सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी त्यांना अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम यांनी त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायकराव कदम यांची नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल तर बालाजी पाटील गौड व आनंद डांगे यांनी ओबीसी विभागाच्या उपरोक्त पदांवर नियुक्ती केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,संपर्क प्रमुख ना.धनंजय मुंडे,ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे,उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार यांसह आदींचे ऋण व्यक्त केले.तर नवनियुक्त सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सर्व वरिष्ठांचे आभार मानले आणि पक्ष संघटन वाढीसह जनसामान्यांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष माधव देशमुख,जिल्हासरचिटणीस अहेमद करखेलीकर,श्याम देशमुख,रवी गेंटेवार,गणेश देशमुख,पंकज देशमुख भोशीकर, सतीश पाटील मातुळकर,राजू कोरटे,श्याम बोडेवार,ॲड.शेख सलीम,सिद्धू पाटील चिंचाळकर, प्रतीक कदम,फईम अहेमद पटेल,शेख जब्बार,तुकाराम महादावाड,बाळासाहेब नांदेकर, शंकर गाढे,राजू पांचाळ,महेंद्र दुधारे,विलास गुंडेराव,विजय पाटील सोळंके, मोहम्मद मझरोद्दीन,गजानन पाटील सोळंके, साहेबराव वाहूळकर,सचिन नांदेकर,नामदेव जाधव,अब्दुल मोईझ अब्दुल खदिर,सय्यद सुलतान,पुंडलिक गायकवाड यांसह आदींची उपस्थिती होती.सदरील सत्कार सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष महेंद्रकुमार कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने ही नवनियुक्त सदस्य व पदाधिकारी यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या…


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !