भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जंबो कार्यकारिणी गठित
आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले नियुक्ती पत्र
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे धडाडीचे नेतृत्व नांदेड जिल्हा उत्तर चे जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार व कुशल युवा नेतृत्व भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भोकर तालुका जंबो कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.तसेच भोकर शहराध्यक्षपदी फईमोद्दीन अहेमदोद्दीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली असून दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सदरील सर्व नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत.
भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी युवा तथा कुशल नेतृत्व राजेश्वर कदम देशमुख यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली.राजेश्वर कदम देशमुख यांच्या नियुक्तीने भोकर तालुक्यात पक्ष संघटन वाढ व बळकटीने वेग घेतला असून उर्वरित तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या अनुषंगाने भोकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,नांदेड दक्षिण चे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी,महिला जिल्हाध्यक्षा पुजाताई व्यवहारे,नांदेड जिल्हा शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे, जिल्हाउपाध्यक्ष माधवराव देशमुख,चेअरमन सोसायटी भोकर, जिल्हाउपाध्यक्ष पंकज देशमुख भोशीकर,जिल्हा सरचिटणीस आनंद डांगे,जिल्हा सरचिटणीस रवी गेंटेवार,जिल्हा सरचिटणीस अहमद करखेलीकर,जिल्हा चिटणीस सिद्धेश्वर पाटील चिंचाळकर,सोशियल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,सेवा दल जिल्हाध्यक्ष गाढे,युवा नेते आनंद पाटील सिंधीकर,जिल्हा संघटक सतीश पाटील मातुळकर, जिल्हा संघटक प्रतीक कदम,जिल्हा सदस्य विजय पाटील सोळंके,जिल्हा सदस्य गणेश चंपतराव देशमुख,जिल्हा सदस्य सतीश चाटलवार,मुदखेड तालुकाध्यक्ष आनंदराव टिप्परसे, हिमायतनगर तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे,सोशियल मीडिया तालुकाध्यक्ष सचिन सुंकळेकर,ॲड.सलीम शेख,शेख जब्बारभाई,ओ.बि.सी.नेते तुकाराम महादावाड,युवा कार्यकर्ते मोहम्मद मझरोद्दीन यांसह आदींची उपस्थिती होती.
सदरील आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार व तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या सहमतीने भोकर तालुका कार्यकारिणीचे नुतन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.त्यात तालुका सचिव पदी महेंद्र निवृत्तीराव कांबळे, तालुका उपाध्यक्ष-राजू ब्रम्हया पांचाळ,तालुका उपाध्यक्ष-विलास तुळशीराम गुंडेराव,तालुका उपाध्यक्ष-दिनकर रामदास जाधव, तालुका उपाध्यक्ष गजानन देवीदासराव सोळंके,तालुका सरचिटणीस-महेंद्र अर्जुनराव दुधारे,तालुका सरचिटणीस-दशरथ मारोती इंदरवाड,तालुका सरचिटणीस-साहेबराव प्रकाशराव वाहूळकर,तालुका सहसचिव-संजय दत्ता बनसोडे, तालुका सल्हागार-बालाजीराव किशनराव देशमुख,मिठू होबा राठोड यांसह आदींचा समावेश आहे.सदरील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,नांदेड जिल्हा शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे,भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांसह आदींनी नुतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तर आमदार विक्रम काळे यांनी ही सर्वांचे अभिनंदन केले व ते म्हणाले की,सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार आणि अगदी ग्रामीण भागापर्यंतच्या तळागळापर्यंत पोहोचवावे.तसेच परिश्रम घेऊन पक्ष वर आणि करत पक्षसंघटन बळकट करावे असे आवाहनही त्यांनी केले.सदरील आढावा बैठकीस व नुतन पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमास बहुसंख्य पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आणि सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.