Sun. Dec 22nd, 2024

भोकर तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष पदी उत्तम बाबळे,तर कार्याध्यक्ष पदी शेख लतिफ

Spread the love

सचिव पदी बालाजी नार्लेवाड,तर उपाध्यक्ष पदी सिद्धार्थ जाधव व प्रा. आर.के कदम यांची निवड

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यातील पत्रकार बांधवांची एक महत्वपुर्ण बैठक दि.१७ जुलै रोजी संपन्न झाली व या बैठकीत भोकर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात आली.या कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी संपादक उत्तम बाबळे यांची फेर निलड करण्यात आली.तर कार्याध्यक्ष पदी पत्रकार शेख लतिफ भाई यांची व सचिव पदी जेष्ठ पत्रकार बालाजी नार्लेवाड आणि उपाध्यक्ष पदी पत्रकार सिद्धार्थ जाधव,पत्रकार प्रा.आर.के.कदम यांची निवड करण्यात आली.

शासकीय विश्रामगृह भोकर यथे दि.१७ जुलै २०२२ रोजी पत्रकार प्रा.आर.के.कदम यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार बांधवांची एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत पत्रकार बांधवांच्या विविध समस्यांबाबद चर्चा झाली व त्या समस्या सोडविण्यासाठी सर्वानुमते भोकर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात आली. सर्वानुमते निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.कोषाध्यक्ष- पत्रकार गंगाधर पडवळे,सहसचिव -कमलाकर बरकमकर,सह कोषाध्यक्ष-विजय चिंतावार, प्रमुख सल्लागार-सुधांशू कांबळे,सह सल्लागार-बालाजी कदम,विठ्ठल सुर्लेकर व सदस्य पदी संदेश कांबळे,विशाल जाधव,गजानन गाडेकर यांसह आदी पत्रकार बांधवांचा या निवडीत समावेश आहे.यावेळी सदरील नुतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिका-यांचा सत्कार करुन भावी सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून विविध स्तरातून या सर्वांचे अभिनंदन होत आहे.

विश्व साहित्यभुषण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन!-संंपादक


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !