भोकर तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांची कंधार येथे झाली बदली
ऐन खरीप पेरणीच्या कार्यकाळात भोकरचे पद अद्याप तरी रिक्त ; शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी कोणावर ?
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे तालुका कृषि अधिकारी म्हणून त्यांनी तब्बल ५ वर्ष सक्षमपणे जबाबदारी सांभाळली व शेतकरी हितार्थ उल्लेखनीय कर्तव्य पार पाडणारे तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांची नुकतीच कंधार तालुका कृषि अधिकारी पदी बदली झाली असून दि.१६ जून रोजी त्यानी नुतन पदभार स्विकारला आहे.
भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे तालुका कृषि अधिकारी म्हणून विठ्ठल गिते यांनी दि.१४ जून २०१८ रोजी पदभार स्विकारला होता.दि.९ जून २०२३ रोजी कंधार तालुका कृषि अधिकारी पदी त्यांची बदली झाली असून दि.१६ जून २०२३ रोजी त्यांनी कंधार जि.नांदेड येथील तालुका कृषि अधिकारी पदाचा भार स्विकारला आहे.भोकर तालुका कृषि अधिकारी म्हणून त्यांनी भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांची तब्बल ५ वर्ष सेवा केली आहे.दरम्यानच्या काळात त्यांनी शासनाच्या विविध योजना प्राधान्याने राबवून येथील शेतकरी हित जोपासले आहे.कमी बोलणे व अधिक काम करणे ही त्यांची कर्तव्य शैली होती.त्यांनी बजावलेले शेतकरी हितार्थचे कर्तव्य येथील शेतकऱ्यांच्या सदैव स्मरणी राहणार आहे.भोकर कार्यालयातील त्यांची जागा रिक्त असून अद्याप तरी येथील पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.ऐन खरीप पेरणीच्या कार्यकाळात हे महत्वाचे पद रिक्त असणे उचित नव्हे.कारण या काळात खतांची कृत्रिम टंचाई होऊ शकते,चढ्या दराने बी-बियाणे विक्री ही होऊ शकतात ? बोगस बियाणे ही शेतकऱ्यांच्या पदरी पडू शकते ? यावर आळा घालणे,उचित कारवाई करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी तालुका कृषि अधिकारी यांच्यावर असते.त्यामुळे हे पद रिक्त असणे योग्य नसून दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना काही समस्या उद्भवल्या तर त्या समस्या सोडविण्याची जबाबदारी कोणावर असणार आहे ? असा प्रश्न शेतकऱ्यांतून होत असून त्वरित नुतन तालुका कृषि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ही होत आहे.तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांना नुतन ठिकाणच्या पुढील सेवाकार्यासाठी संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!