भोकर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी भा.पो.से. श्रीम.शफकत आमना
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सरळ सेवाप्रविष्ट ११ भा.पो.से.अधिकायांची दि.१७ ऑक्टोबर रोजी पदस्थापना करण्यात आली असून गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या भोकर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी भा.पो.से.श्रीम.शफकत आमना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने राज्याच्या गृह विभागाने पोलीस विभागात प्रशिक्षण पुर्ण केलेले सरळ सेवाप्रविष्ट भा.पो.से (आयपीएस) ११ पोलीस अधिका-यांची दि.१७ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून शासन आदेश क्र.आयपीएस -२१२२/प्र.क्र.३५३/पोल-१. ने नियुक्ती केली आहे.यात श्रीम.भा.पो.से.श्रीम.शफकत आमना यांचा समावेश आहे.भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर हे दि.३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांची ही जागा रिक्त होती.प्रभारी पदभार काही पोलीस अधिका-यांना दिला जात होता म्हणून या रिक्त जागेवर भा.पो.से.श्रीम.शफकत आमना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सरळ सेवाप्रविष्ट भा.पो.से.पोलीस अधिकारी आयपीएस योगेश कुमार यांची भोकर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या नंतर सरळ सेवाप्रविष्ट व सन २०१९ च्या तुकडीतील प्रशिक्षित भा.पो.से. श्रीम.शफकत आमना यांची नियुक्ती भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नियुक्ती झाल्याने या विभागातील कायदा,शांतता व सुव्यवस्थेची घडी सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
भोकर पोलीस उपविभागाच्या नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी भा.पो.से.शफकत आमना यांचे संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार न्युज लाईव्ह परिवाराच्या वतीने मनःपुर्वक हार्दिक स्वागत व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा !